Fraud News | लष्करात नोकरीस असल्याचं सांगत भामटयानं तरूणीशी केला विवाह; मुलीच्या भावासह 50 ते 60 जणांची लाखोंची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाविद्यालयलयीन तरुणीची आधार कार्डमुळे (AADHAAR CARD) तरुणाशी ओळख झाली. तिच्यासह कुटुंबाची आणि सोबतच शेकडो मुलांची फसवणूक (Fraud News) झाल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. त्या भामट्यांन लष्करात नोकरीस असल्याचे सांगत तरुणीशी विवाह केला आणि नंतर लष्करात नोकरी लावतो म्हणून तिच्या भावासह काही तरुणांकडून 50 ते 60 लाख रुपये घेऊन पळ काढला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस (Bibwewadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud News | Saying that he has a job in the army, cheater married with a young woman; Millions cheated 50 to 60 people including the girl’s brother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी योगेश दत्तू गायकवाड (रा. किशोरे, कन्नड, औरंगाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची आळदी येथील आहे.
ती एका महाविद्यालयात शिक्षण घेते. दरम्यान तिची आई आजारी असल्याने ती एकदिवस बिबवेवाडी परिसरातील रुग्णालयात आईसोबत आली होती.
रुग्णालयात आईला दाखवल्यानंतर ती आईला घेऊन घरी जाण्यासाठी बस स्टॉपजवळ थांबली होती.
यावेळी अचानक एक तरुण समोरून जात असताना त्याचे आधार कार्ड खाली पडले.
तरुणीने आधार कार्ड पडल्याचे पाहिले व पटकन ते उचलले.
तसेच तरुणाला आवाज देऊन त्याला तुमचे आधार कार्ड पकडल्याचे सांगत त्याला आधार कार्ड दिले.

भामट्या तरुणांन हीच संधी साधत या तरुणीला खूपच धन्यवाद देत बोलण्यास सुरुवात केली.
मी लष्करात नोकरीस आहे. आधार कार्ड सतत लागत.
तुमच्यामुळे माझं आधार कार्ड मिळालं असे म्हणत गप्पा सुरु केल्या.
तर काही वेळान तरुणीला मोबाईल क्रमांक देत काही लागलं तर नक्की सांगा असे, सांगत तिचाही मोबाईल क्रमांक मिळवला.

दुसऱ्याच दिवशी तरुणीला “हॅलो” अ‍ॅपवर तरुणीला मॅसेज केला आणि तेथून त्यांच्यात बोलणं सुरू झालं.
तरुणीला लष्करात असल्याचे सांगत गणवेश घातलेले फोटो पाठवले.
तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तिला थेट लग्नाची मागणी घातली.
पंधरा दिवस फोनवर बोलणं सुरू झाल्यानंतर तो एकदिवस तरुणीच्या घरी आला.
त्याने तिच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यांनाही लष्करात असल्याचे सांगितले.
मुलीसोबत लग्न करायचे आहे, असे सांगून लग्नाची मागणी घातली.
पण, मुलीच्या कुटुंबाने त्याला तुझ्या घरच्यांशी बोलायचे आहे.
त्यांची भेट घ्यावी लागेल असे सांगितले. आई-वडील औरंगाबाद येथे असतात. नुकताच नवीन फ्लॅट घेतला आहे, असे सांगत मी बोलावून घेतो असे सांगितले.
काही दिवसांनी तरुणीच्या कुटुंबाला औरंगाबाद येथे बोलावून घेतले.
पण, तरुणी व तिचे कुटुंब तेथे गेल्यानंतर त्याने आई-वडिलांना कोरोना झाला आहे, ते भेटू शकत नाहीत असे सांगत भेट टाळली.

तर आजच विवाह करावा, अशी आईवडिलांची इच्छा आहे, असे सांगत त्याने गडबडकरून घरीच दोन हार आणून तरुणीशी विवाह केला. दहा दिवस तरुणीला घेऊन तो औरंगाबाद इथे राहिला.
अचानक एकदिवस तो तरुणीला घेऊन पुण्यात आला व आई वडिलांकडे सोडून गेला.
तसेच त्यांना मला अर्जंट जावे लागत असून, कोणी लष्करात नोकरी करण्यास इच्छुक असेल तर सांगा.
दोन लाख रुपये घेऊन नोकरी लावतो, असेही जातेवेळी सांगितले.

फिर्यादी तरुणीच्या घरच्यांनी विश्वास ठेवत तरुणीच्या भावालाच नोकरी लावण्यासाठी त्याला 2 लाख रुपये दिले. यानंतर एकदिवस तो पुण्यात आला.
त्याने फिर्यादी तरुणीच्या भावामार्फत काही तरुणांची भेट घेतली आणि त्यांना लष्करात नोकरीची माहिती दिली. तो पुन्हा निघून गेला. यानंतर त्याने फिर्यादी तरुणीला बँक खाते क्रमांक दिला.
तसेच इतर तरुणांना या खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. मुलांना नोकरी लागेल असे वाटल्याने प्रत्येकी दोन लाख असे एकूण 50 ते 60 लाख रुपये दिले.
काही दिवसांनी पोस्टाने या तरुणीच्या घरी अपॉइंटमेंट लेटर आले. यानंतर त्याने फिर्यादी तरुणीला हे लेटर त्या-त्या मुलांना देण्यास सांगितले.
काही तरुणांना पुण्यातीलच लष्करात नोकरी लागल्याचे अपॉइंटमेंट लेटर होते. काही तरुण तेथे गेले असता त्यांना हे लेटर बनावट असल्याचे समजले.

तरुण फिर्यादीच्या घरी गेले व त्यांना हा प्रकार सांगितला. यावेळी फिर्यादी तरुणीने तिच्या भावाला दिलेले अपॉइंटमेंट लेटर (Appointment letter) पाहिले व त्याला घेऊन ते जॉईन होण्यास दिलेल्या पत्यावर गेले.
यावेळी त्यांनाही अशी भरती झालेली नाही. हे बोगस असल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक (Fraud) झाली असल्याची खात्री होताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

Web Title : Fraud News | Saying that he has a job in the army, cheater married with a young woman; Millions cheated 50 to 60 people including the girl’s brother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Suicide News | धक्कादायक ! पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या