जिल्हा सहकारी बँकेची फसवणूक

दोन गोल्ड व्हॅल्युअर, 22 कर्जदारांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीरामपूर येथील जिल्हा बँकेच्या दोन शाखांमध्ये खोटे व काही खरे परंतु कमी वजनाचे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलले व कर्जफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही शाखांचे दोन गोल्ड व्हॅल्युअर व २२ कर्जदारांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेचे शाखाधिकारी विलास सखाराम कसबे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोल्ड व्हॅल्युअर रामेश्वर कचरू माळवे, अशोक कचरू माळवे (दोघे रा. लोणार गल्ली), लता प्रभाकर गोरे, (रा. कमालपूर), असमा रिझवान शेख (रा. सुभेदार वस्ती), इसाक अजीज पटेल (रा. दशमेशनगर), संपत सावळेराम माने (रांजणखोल, ता. राहाता), भारती प्रदीप करंडे (काळाराम मंदिर), रेश्मा इसाक पटेल (दशमेशनगर), खंडेराव मोहनराव सरोदे, सुनील खंडेराव सरोदे (दोघे रा. बेलपिंपळगाव, ता.
नेवासा), कांचन अशोक माळवे, पल्लवी राजन माळवे, अभिषेक अशोक माळवे (तिघे रा. वॉर्ड नं. ५), जितेश प्रकाश खैरे (रा. थत्ते ग्राउंड), राजेंद्र बबनराव अंबीलवादे (रा. गोपीनाथनगर), कैलास निवृत्ती हिरे (रा. नाऊर), ज्ञानेश्वर भास्कर सोनार (रा. सरस्वती
कॉलनी), योगेश सुभाष चिंतामणी (रा. धान्य गल्ली), लक्ष्मण पांडुरंग पटारे (रा. बेलपिंपळगाव), शौकत साहेबखाँ पठाण (रा.हरेगाव), प्रकाश नारायण खैरे (रा. लबडे वस्ती), राजेश भास्कर वाव्हळ (रा. वॉर्ड ७), हेमंत अमृतलाल सोळंकी (रा. वॉर्ड क्र. ७), सीमा सुनिल आनंद (रा. वॉर्ड १) यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ४६५, ४८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा बँकेच्या शहर शाखेत काम पाहत होते. शहर शाखेचे शाखाधिकारी ज्ञानदेव काळे यांच्या काळात १७ व शिवाजी रोडच्या शाखेतील शाखाधिकारी सदाशिव गोसावी यांच्या काळात पाच जणांनी सोनेतारण कर्ज घेतले होते.

सोन्याचे दागिने गहाण टाकताना ते कापडी पिशवीत सीलबंद करून त्यावर गोल्ड व्हॅल्युअर, कर्जदार व शाखाधिकारी यांच्यासह्या घेतल्या जातात व कर्ज भरल्यानंतर कर्जदारासमोर पिशवी उघडून दागिने परत केले जातात. बँकेने या २२ जणांना सोने तारण कर्ज दिले होते. या कर्ज प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे.