‘त्या’ वधु-वर संकेतस्थळावरील ओळख तरुणीला पडली महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शादी डॉट कॉमवरील ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली. शादी डॉट कॉमवरील ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने गिफ्टचा बहाणा करुन अडीच लाखांना गंडा घातला.

याप्रकरणी अलिशा भगवान मेश्राम (वय ३१, रा. वाकड) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च २०१८ ते ११ मे २०१८ दरम्यान घडला. अलिशा यांची शादी डॉट कॉम या पोर्टलवरुन एका तरुणाशी ओळख झाली होती. त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांच्यासाठी एक गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर ते कस्टममध्ये अडकल्याचे सांगून त्यावर टेररिस्ट अ‍ॅक्टनुसार कारवाई होईल, अशी भिती दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळे कर व फीच्या नावाखाली २ लाख ४७ हजार रुपये बँक खात्यात भरायला सांगून त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक 

इशू सिंधू नगरचे नवीन एस.पी., शर्मा यांची नागपूर सीआयडीला बदली 

विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या 

राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या 

राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या