Pimpri News : बनावट कागदपत्रे तयार करून कंपनीला 7 कोटींचा गंडा, FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   लोखंडी मालाचा पुरवठा केल्याचे खोटी कागदपत्रे तयार करून त्याद्वारे तब्बल 6 कोटी 83 लाख 7 हजार 678 रुपयांना कंपनीला गंडा घातल्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. 2018 ते 2020 या कालावधीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी आरोपींच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सत्यानंद सूर्यनाथ सिंग (वय 62, रा. दहिसर इस्ट, मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मथु के. नरसिंहा, बाळासाहेब डोके, नीलेश कदम, ज्ञानेश्वर गुळींग, संचालक, गंगा आयर्न अँड स्टील ट्रेडिंग कंपनी मुंबई, संचालक सुदर्शन फोर्ज अँड स्टील वर्ल्ड पिंपरी, संचालक प्रीती इंटरनॅशनल मुंबई, संचालक रुईया अलॉय प्रा. ली. मुंबई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मथु नरसिंहा, बाळासाहेब डोके, निलेश कदम आणि ज्ञानेश्वर गुळींग हे आरोपी फिर्यांदींच्या सिंग अँड सन्स फर्म या कंपनीत काम करत होते. त्यांनी अन्य आरोपींशी संगनमत करून 2018 ते 2020 या कालावधीत लोखंडी मालाचा पुरवठा केल्याचे दाखवले. त्याचे खोटे टीसी, खोटे इनवॉईस बिल व बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी यांच्या संस्थेची 6 कोटी 83 लाख 7 हजार 678 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.