Paytm युजर्ससाठी मोठी बातमी ! ‘या’ छोट्या चुकीमुळं होऊ शकतं तुमचं बँक ‘अकाऊंट’ रिकामं, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पेटीएम संबंधित काही मेसेज फिरत आहे, ज्यात लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास तुमची मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. पेटीएम केवायसीच्या नावे फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले.
त्यात अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात येत आहे. त्यामुळे अखेर पेटीएमनेच ग्राहकांचा विचार करता एक सूचना जारी केली. त्यामुळे केवायसीसाठी कॉल आला किंवा मेसेज आला तर तुम्ही काय करायला हवे हे तुम्हाला माहित हवे. त्यासाठीची सूचना पेटीएम अॅप सुरु करताच तुमच्या डिवाइसच्या स्क्रीवर येईल. याकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा तुमचे बँक खाते रिक्त होऊ शकते.
पेटीएमने दिल्या सुचना –
पेटीएमने आपल्या सूचनेत सांगितले की मागील काही महिन्यापासून फसवणूकीचे नव नव्या पद्धती समोर येत आहे. जेथे आमच्या ग्राहकांना कॉल करुन सांगितले जाते की तुमच्या KYC ची सीमा समाप्त झाली आहे आणि आम्ही पेटीएममधून तुमचे केवासी एक्टीव्ह करण्यासाठी कॉल करत आहे. त्यानंतर ते तुम्हाला AnyDesk, TeamViewer, QuickSupport इत्यादी App इनस्टॉल करण्यासाठी सांगतात आणि अॅपची परमिशन घेतात.
Pls don’t trust any SMS send of blocking your Paytm account or suggestion to do a KYC.
These are fraudsters attempting on your account. Pls RT. pic.twitter.com/vHKBFmo3nc— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) November 19, 2019
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी सांगितले की जर तुम्हाला कोणी कॉल लावून सांगितले की तुमच्या Paytm KYC ची सीमा समाप्त होत आहे आणि ते तुमचा केवायसी फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून करुन देतील तर त्यांना नकार कळवा.
– काही अॅप इनस्टॉल करुन हे फसवणूक करणारे तुम्हाला एक 9 डिजीटचा कोड मेसेज करतात. त्यानंतर ते तुमचा मोबइल आणि लॅपटॉप अॅक्सेस करतात. त्याद्वारे तुमची सर्व माहिती जमा केली जाते.
– जर ते म्हणाले की तुमचा केवायसी पूर्ण झाला आहे आणि आता कॅशबॅक प्राप्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक लिंक असलेल्या मेसेजवर किल्क करावा लागेल. तर तुम्ही तो मेसेज डिलीट करा आणि त्या लिंकवर क्लिक करु नका.
– केवायसी संबंधित ऑफरला प्राप्त करण्यासाठी पेटीएमचा कोणताही आधिकारी तुम्हाला कोणतीही लिंक पाठवत नाही आणि त्यावर क्लिक करायला सांगत नाही.
– कंपनीने सांगितले की ते आपल्या ग्राहकांचे केवायसी फक्त आपल्या एजेंटद्वारे करुन घेतात. जे ग्राहकांच्या समोरच केवायसी करतात. कंपनीने केवायसीसाठी अनेक सेंटर्स देखील बनवले आहेत.
– तुम्ही पेटीएम अॅपच्या माध्यमातून मिनिमम केवायसी पूर्ण करु शकतात. त्यामुळे हे आवश्यक आहे की केवायसी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन आला किंवा मेसेज आला किंवा ईमेल आला तर त्याला उत्तर देऊ नका. अन्यथा तुमचे बँक खाते रिक्त होईल.
Visit : Policenama.com
- रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी खा पिस्ता, ‘हे’ आहेत ९ खास फायदे
- पूर्ण शाकाहारी ‘डाएट प्लॅन’ने वजन करा कमी, जाणून घ्या महत्वाच्या ६ टिप्स
- केसरचे ‘हे’ उपाय केल्याने होतील ‘हे’ ४ महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या
- वयाची चिंता नको, पन्नाशितील ‘या’ ५ कलाकारांकडून घ्या प्रेरणा…रहा फिट
- ‘या’ जोडप्याने घटवले तब्बल १८१ किलो वजन, तुम्ही सुद्धा घेऊ शकता आदर्श
- महिलांनो, ‘कार्डिओ’ व्यायामासह बिनधास्त करा ‘वेट ट्रेनिंग’, हे आहेत ४ फायदे
- ट्रेनर ‘सर्टिफाइड’ आहे की नाही, कसे तपासावे? ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
- विसरभोळेपणा वाढलाय का? दुर्लक्ष करू नका ‘हा’ आजारही असू शकतो
- नर्व्हस, अस्वस्थ झाल्यासारखे वाटतेय ? मग हे ११ सोपे उपाय करा
- नकारात्मक विचार घालवून ‘रिफ्रेश’ होण्यासाठी ‘हे’ करा, होतील हे ५ फायदे