शेतकर्‍यांची फसवणूक करण्यास पकडण्यासाठी तब्बल 3 दिवस लावला दिल्लीत ‘सापळा’; 1.75 कोटींची केली होती फसवणूक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Fraud | स्टेट बँक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (State Bank Life Insurance Policy) चा एजंट कोड व म्युच्युअल फंड (Agent code and mutual funds) च्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून शेतकर्‍याची पावणे दोन कोटींची फसवणूक (Fraud) करणार्‍या सायबर चोर (Cyber thief) ट्याला पकडण्यासाठी जळगाव सायबर पोलीस (Jalgaon Cyber Police) दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी तब्बल तीन दिवस सापळा लावल्यानंतर हा चोरटा यांच्या हाती लागला. विकास सुरींदर कपूर (रा. पालम गाव, दिल्ली) असे या सायबर चोरट्याचे नाव आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

मुक्ताईनगर येथील वामन महाजन यांना विकास कपूर आणि त्यांच्या साथीदारांनी 2014 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान वेळोवेळी संपर्क साधून त्यांना सेवा निवृत्तीचे पैसे विमा कंपनीत गुंतवले तर दुप्पट मिळेल, त्याशिवाय त्याच्या आधारे तुम्हाला कर्ज (loan) ही मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार महाजन यांनी या चोरट्यांनी सांगितल्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यात ३५ वेळा १ कोटी ७३ लाख ८९ हजार रुपये ऑनलाईन भरले. मात्र, मुदत होऊन गेली तरी त्यांना दुप्पट पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मार्च २०२० मध्ये मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

नंतर हा गुन्हा सायबर पोलिसां (Cyber crime police) कडे वर्ग करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी संशयिताचे बँक खाते बनावट असून सीम कार्डही बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर संशयित आरोपी दिल्लीतील पालम गावात रहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक नुकतेच दिल्लीला पाठविण्यात आले होते. या पथकाने पालम गावात तब्बल तीन दिवस सापळा रचला. त्यानंतर विकास कपूर हा पालम गावात आल्याबरोबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Fraud|’Trap’ in Delhi for three days to catch farmers cheating

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स