अ‍ॅपवर 15 दिवसात पैसे ‘डबल’ होण्याचे आमिष दाखवून 250 कोटींची फसवणूक, 50 लाख लोकांना ‘गंडा’

देहरादून : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तराखंड पोलिसांनी एका मोठ्या फसवणुकी (Fraud) चा खुलासा केला आहे. उत्तराखंड एसटीएफने नोएडातून एका आरोपीला 250 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ही फसवणूक केवळ चार महिन्याच्या कालावधीत झाली आहे.

चीनच्या स्टार्टअप योजनेंतर्गत अ‍ॅपद्वारे फसवणुक(Fraud) करण्यात आली. देशातील सुमारी 50 लाख लोकांद्वारे हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे लोकांना 15 दिवसात पैसे डबल होण्याचे आमिष दाखवले जात होते.

फसवणुकीत 15 दिवसात पैसे दुप्पट करण्यासाठी अगोदर लोकांना पॉवर बँक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात होते.
ज्यानंतर त्यांना 15 दिवसात पैसे डबल होण्याचे आमिष दाखवले जात होते.

संपूर्ण प्रकरणाचा खुलासा काहीसा अशाप्रकारे झाला की, जेव्हा हरिद्वार येथे राहणार्‍याने पोलिसांना माहिती दिली की, पॉवर बँक अ‍ॅपद्वारे पैसे दुप्पट करण्यासाठी दोनवेळा अनुक्रम 93 हजार आणि 72 हजार जमा करण्यात आले होते जे 15 दिवसात डबल होणार असल्याचे सांगितले होते.

परंतु असे न झाल्याने पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
ज्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासात आढळले की, सर्व रक्कम वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केली होती.
जेव्हा आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करण्यात आला तेव्हा 250 कोटीची फसवणूक समोर आली.

उत्तराखंड एसटीएफचे एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, पोलीसांच्या तपासात एक मोठी गोष्ट समोर आली की, फसवणूक करणारे परदेशी गुंतवणुकदार भारतातील उद्योगपतींना कमिशनचे आमिष दाखवून अ‍ॅपद्वारे लोकांना लोन देत असल्याचे सांगत असत.

नंतर यामध्ये बदल करून लोकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवले जाऊ लागले. पैसे एकाच खात्यात टाकून भारतातील लोकांच्या खात्यात टाकले गेले.
सुरुवातील काही लोकांना पैसे परत सुद्धा दिले गेले.

आरोपींकडून 19 लॅपटॉप, 592 सिम कार्ड जप्त
एसएसपी अजय सिंह यांनी म्हटले, नोएडातून या प्रकणातील एक आरोपी पवन पांडेय यास अटक केली आहे.
आरोपीकडे 19 लॅपटॉप, 592 सिम कार्ड, 5 मोबाइल फोन, 4 एटीएम कार्ड आणि 1 पासपोर्ट जप्त केला आहे.
एसटीएफला तपासात आढळले की, ही रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये बदलून परदेशात पाठवली जात होती.

देहरादूनचे एडीजी अभिनव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनच्या स्टार्ट अप योजनेंतर्गत असे अ‍ॅप बनवले गेले आहे.
त्यांनी म्हटले की, या प्रकरणाची माहिती तपास एजन्सी आयबी आणि रॉ ला देण्यात आली आहे. ज्या परदेशी लोकांची नावे समोर आली आहेत,
त्यांच्या दुतावासाशी संपर्क करून त्यांची माहिती मागवली जात आहे.
लवकरच माहिती समोर येईल.
आतापर्यंत या प्रकरणात उत्तराखंडमध्ये 2, बेंगळुरुत 1 केस दाखल झालीआहे.

हे देखील वाचा

धक्कादायक ! भाजप नेत्याचे मॉडेलसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, प्रचंड खळबळ

तुरुंगातील ‘या’ अभिनेत्यांवरुन दोन अभिनेत्रीमध्ये रंगल Twitter war, ती म्हणाली – ‘तुला का मिर्ची लागली?

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा