धक्कादायक ! स्वत:ला भाजप नेता सांगून 32 हजार महिलांची ‘फसवणूक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुष्कर्माच्या प्रकरणात अडकलेले माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांच्यानंतर शाहजहापूरच्या मुमुक्ष आश्रमाशी जोडलेले आणखी एक प्रकरणं समोर आले आहे. प्रकरण 2.5 कोटी रुपयांच्या फसवणूकीचे आहे, ज्यात आग्रा जिल्ह्याच्या 32 हजार महिलांची शिकार झाली. फसवणूकीचा आरोप एनजीओ सार्थक सोशल वेलफेअर सोसायटीवर आहे. ज्यात शाहजहांपूरचे रहिवासी अमित राजपूत निदेशक आणि अरुण कुमार अग्निहोत्री अध्यक्ष आहेत. अमित या फसवणूकीच्या प्रकरणाचा मास्टर माइंड मानला जात आहे.

चार वेळा बदलले ऑफिस –
फसवणूक झालेल्या महिलेने सांगितले की फसवणूक करणाऱ्या आरोपींनी मागील सहा महिन्यात चार वेळा आपले ऑफिसचे ठिकाण बदलले. नव्या नव्या भागात जाऊन महिलांना फसवण्याचा प्रकार केला जात असे.सर्वात आधी सिकंदरमध्ये कार्यालयात सुरु करण्यात आले होते. त्यानंतर आवास विकासमध्ये सेक्टर 8 मध्ये त्यानंतर 4 मध्ये कार्यालय सुरु करण्यात आले. त्यावर आता कुलूप लावण्यात आला आहे.

नारी सशक्तिकरणाचे कारण सांगून केली फसवणूक –
अमित आणि अरुण स्वत:ला भाजप नेता असल्याचे सांगायचे. ते सांगत असे की नारी सशक्तिकरणाच्या अभियानाला पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. ते प्रोजेक्टवर असे फोटो दाखवत असे की ज्यात ते बैठकीत किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात भाग घेतात. एक फोटो मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूकाचा दाखवण्यात आले, ज्या भाजपच्या मोठ्या नेत्यांचे फोटो होते.

ही फसवणूक 2017 पासून सुरु झाली होती. गल्ली बोळात याचा प्रचार करण्यात येत होता. त्यांचे लक्ष महिला होत्या, त्यांना लालच दाखवून ज्या महिला 18 वर्षापेक्षा जास्त आहेत त्या महिलांचा 20 – 20 चा समूह बनवण्यात येईल त्यानंतर त्यांना शिवणं काम, मेहंदी, विणकाम अशा कामांचे प्रशिक्षण देण्यात येत असे. जे हे काम करतील त्यांना 2 हजार रुपये मिळतील. तर समूहात 25 महिला असल्यास अडीच हजार रुपये द्यावे लागतील.

प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना 790 रुपये नोंदणी शुल्क द्यावे लागत असते. प्रशिक्षणानंतर प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतील. त्यानंतर गल्ली बोळात समूह बनवण्यात आले. सुरुवातील काही महिलांना काही रक्कम देण्यात आल्या आहेत. आग्रामध्ये 1600 समूह बनवण्यात आले आहेत. या वर्षापासून जानेवारीपासून पैसे देण्यात आले नाहीत. असे सांगण्यात आले की हे पैसे एकदम देण्यात येतील.

महिलांनी अरुण अग्निहोत्रीसमोर विरोध दर्शवला, त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चेक देण्यात आले. ते देखील खोटे होते. यानंतर महिलांनी तक्रार दाखल केली. त्या सिंकदाराच्या पोलीस स्थानकात पोहचलेल्या मालती आणि मीना पाठक यांनी सांंगितले की ते धमकी देत होते की तक्रार दाखल केली तर पैसे परत मिळणार नाही.

हे आहेत आरोपी –
1) . अरुण कुमार अग्निहोत्री – सेक्टर जी एलडीए कॉलनी, आशियाना, कानपूर रोड, लखनऊ (मूळ निवासी शाहजहापूर)
2) . अमित राजपूत, मुमुक्ष आश्रम, मौजमपूर, शाहजहापूर
3) . आकाश सक्सेना, प्रोजेक्ट मॅनेजर, आरके पूरम, पश्चिमपुरी आग्रा
यात अमित हा या प्रकरणातील मास्टरमाइंट मानला जात आहे.

Visit : Policenama.com