‘कडकनाथ’ प्रकरणात सखोल तपास करू : अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगढ पर्यंत पोहोचलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात आत्तापर्यंत तब्बल ६०० हुन अधिक तक्रारी अर्ज दाखल झालेे आहेत. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. त्याचा सखोल तपास केला जाईल अशी ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कडकनाथ कोंबडी प्रकरणात तक्रार देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. लाखो रुपयांची फसवणूक झालेल्यांची संख्या हजारांमध्ये आहे. या प्रकरणात अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून कर्मचारी आणि संचालक पसार झाले आहेत. गुंतवलेले पैसे बुडणार अशी भीती आता अनेकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसह बडे लोकही अस्वस्थ आहेत. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केलेल्या आवाहनानुसार फसवणूक झालेल्यांनी आपले तक्रारी अर्ज देण्यास सुरवात केली आहे.

या प्रकरणी पोलीस गांभीर्याने तपास करतील अशी ग्वाही सुहेल शर्मा यांनी यावेळी दिली. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही लोकांचा शोध सुरु आहे. पुढील कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –