#FraudAlert | तुम्हाला मेसेज आला का? विक्रमी व्हॅक्सीनेशनमुळे सरकार देत आहे 3 महिन्यांचे मोफत रिचार्ज, जाणून घ्या काय आहे सत्य

नवी दिल्ली : #FraudAlert | संकट काळात सुद्धा हॅकर्स भोळ्या-भाबड्या लोकांचा फायदा घेण्यास मागे-पुढे पहात नाहीत. आता हॅकर्सने लोकांना फसवण्याची नवीन पद्धत शोधली आहे. सोशल मीडियावर (Social Media) वायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार Jio, Airtel, Vi ग्राहकांना विक्रमी कोविड-19 व्हॅक्सीनेशनचा उत्सव साजरा करण्यासाठी तीन महिन्याचे मोफत मोबाईल रिचार्ज देत आहे. जर तुमच्याकडे सुद्धा हा मेसेज आला असेल तर थोडे सतर्क व्हा. या वायरल मेसेजचे सत्य जाणून घेवूयात. (#FraudAlert)

 

 

वायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, कोविड-19 लसीकरण विक्रमी स्तरावर केल्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व भारतीय वापरकर्त्यांना तीन महिन्यांचे मोफत मोबाईल रिचार्ज मिळेल. जर तुमच्याकडे जिओ, एयरटेल आणि व्हीआय सिम कार्ड असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. (#FraudAlert)

 

वायरल मेसेजमध्ये तीन महिन्याचे मोफत रिचार्ज मिळवण्यासाठी एक ऑनलाइन लिंक सुद्धा दिली आहे. मेसेजमध्ये पुढे लिहिले आहे की, ही ऑफर केवळ 24 तासांसाठी वैध आहे.

 

वायरल मेसेज बनावट आहे – PIB

या दरम्यान, सरकारने स्पष्ट केले आहे की, वायरल पोस्ट बनावट आहे.
पीआयबीची सत्य पडताळणी शाखा, पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले की,
वायरल मेसेज बनावट आहे. भारत सरकारद्वारे अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

 

Web Title :- #FraudAlert | viral post is fake govt is offering 3 month free recharge to jio airtel and vi customers to celebrate record covid 19 vaccination

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा