#FraudArhaanKhan : रश्मी देसाईचे स्क्रीनशॉट्स व्हायरल ! Ex बॉयफ्रेंड अरहानच्या खात्यात ट्रान्सफर केले होते लाखो रुपये

पोलिसनामा ऑनलाइन –बिग बॉस 13 मध्ये असताना अरहान खाननं रश्मी देसाईला आपल्या मनातल्या भवना सांगत प्रपोज केलं होतं. दोघांची लव स्टोरी सुरू झाली होती. परंतु सलमान खाननं अरहान खानबद्दल असे काही खुलासे केले जे रश्मीला माहिती नव्हते आणि ती दु:खी झाली. नंतर रश्मीनं असं ठरवलं की, ती आता अरहान खान सोबत राहणार नाही. परंतु आता अशी माहिती आहे की, रश्मी देसाई आपला एक्स बॉयफ्रेंड अरहान खानला भेटण्यासाठी उत्सुक आहे.

ही भेट होण्याच्या आधी स्थिती एवढी खराब होती की, रश्मी देसाईच्या चाहत्यांनी रश्मीकडून अरहानला पैसे पाठवल्याचे स्क्रिन शॉट्स शेअर केले होते. नंतर हे डिलीटही करणयात आले. यात एका अकाऊंटमध्ये सतत लाखो रुपये पाठवण्यात आले आहेत असा दावा करण्यात येत आहे. ज्यावर पैसे पाठवले ते अकाऊंट अरहानचं आहे.

https://twitter.com/RubyatRisha/status/1252233924635267072

याआधी नॅशनल टेलिव्हिजनवर जे काही झालं आणि नंतर शोमध्ये पुन्हा देवोलिनाकडून अरहान खानच्या खोटेपणाबद्दल रश्मीला जे काही कळालं ते ऐकल्यानंतर ती क्वचितच पुन्हा एक्स बॉयफ्रेंडअरहानला भेटेले. आता रश्मीला अरहानला भेटायचं आहे.

https://twitter.com/sharmat111/status/1252233748600352778