QR Code स्कॅन करून पेमेंट करताय ? तर सावधान, तुम्हाला बसू शकतो मोठा फटका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेक डिजिटल पर्यायांचा वापर करत असतो. त्यासाठी Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या अ‍ॅप्सचा वापर करतो. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपण मोबाईल नंबर टाकून पैसे देतो तर अनेकदा QR Code स्कॅन करून देत असतो. मात्र, आपण कोड स्कॅन करून पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची.

QR अर्थात Quick Response कोड सर्वात आधी जपानमध्ये बनविण्यात आला होता. आता भारतात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पण फ्रॉडस्टर म्हणजे याचा गैरव्यवहार करणारा याचा फायदा घेतो. त्याच्याकडून QR Code बदलला जातो. त्यामुळे संबंधित रक्कम फ्रॉडस्टरच्या खात्यात जाते.

QR Code बदलून जर दुसरा कुठला Code टाकला तर त्याला फिशिंग म्हटले जाते. त्यामुळे तुमचे पैसे दुकानदाराला न मिळता फ्रॉडस्टरच्या खात्यात जमा होतात.

मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून QR

QR Code फिशिंग वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. त्यासाठी स्कॅमर तुम्हाला मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून QR Code सेंड करू शकतो. ज्यामध्ये तुम्हाला लॉटरी लागल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये तुम्हाला UPI पिन देऊन पैसे आपल्या बँकेच्या खात्यात घेण्याचे सांगितले जाते. तेव्हा QR Code स्कॅन करून तुम्हाला UPI पिन मागितला जातो. तुम्हाला वाटेल की हा पैसा तुमच्या खात्यात जाईल पण UPI पेमेंट टाकल्यानंतर स्कॅमरच्या खात्यात हा पैसा टाकला जातो.

अशी घ्या खबरदारी…

– पेमेंट करताना रिसिव्हरचे नाव येते. ते नाव नक्की तपासून घ्यावे.

– मेसेज किंवा ई-मेलवर कोणत्याही अनोळखी किंवा नव्या QR कोडला स्कॅन करू नका.

– QR Code ची सविस्तर माहिती देणाऱ्या अ‍ॅप डाऊनलोड करून स्कॅन करावे.

– चुकीने झालेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती बँकेला तातडीने द्यावी.

– जर आपल्याबाबत अशी काही गोष्ट घडल्यास तातडीने सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी.