प्रियकर बनला ‘सिरीयल किलर’, 5 दिवसात 3 खून, गर्लफ्रेन्डची देखील केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील बिजनोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका प्रेमीने आपल्या प्रेमिकेचे दुसरीकडे लग्न ठरल्याने तिची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याच व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी त्याच्या भागातील दोन युवकांची गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

आश‍िक बना सीर‍ियल क‍िलर, 5 द‍िन में 3 मर्डर, गर्लफ्रेंड का भी कत्ल

आश‍िक बना सीर‍ियल क‍िलर, 5 द‍िन में 3 मर्डर, गर्लफ्रेंड का भी कत्ल

आश‍िक बना सीर‍ियल क‍िलर, 5 द‍िन में 3 मर्डर, गर्लफ्रेंड का भी कत्ल

 

Image may contain: 2 people, selfie and close-up

हत्या केल्यानंतर आरोपी उसाच्या शेतात लपून बसला होता. त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी झाला. येथील जॉनी नावाच्या मुलाचे नीतिका नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. नीतिका हि दुबई एयरलाईन्समध्ये एयरहोस्टेस होती. कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले होते. त्यामुळे नाराज झालेल्या जॉनी याने तिच्या घरी येत तिच्यावर गोळी झाडत तिची हत्या केली. डिसेंबर महिन्यात तिचे लग्न होणार होते.

Image may contain: 1 person, close-up

तर दुसरीकडे हत्या करून पळालेला जॉनी शेजारच्या उसाच्या शेतात लपून बसला होता. मात्र अंधाराचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, पोलिसांना मागील काही दिवसांपासून तो एका गुन्ह्यात हवा होता. त्याने गावातीलच दोन भावांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्याने वैयक्तिक वादातून या दोन भावांची हत्या केली होती.

 

 

Visit : Policenama.com