साडे तीनशे रुग्णांची मोफत तपासणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

जागतिक हृदय दिनाच्या निमित्त चिंचवड येथील सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरामध्ये ३५० पेक्षा जास्त रुग्णांनी टुडी इको, टीएमटी, हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला आणि ऍन्जिओग्राफी तपासणी करून घेतली. त्याच सोबत बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयावर होणाऱ्या दुष्परिणांबद्दल हृदयरोग तज्ज्ञ तसेच आहार तज्ज्ञांनी नागरिकांचे मार्गदर्शनही केले.
किमान चार हजार रुपयांचा खर्च असणाऱ्या या तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b04ee4a2-c478-11e8-91dc-9dd208342354′]

तर काही तपासणी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व सामाण्याना परवडणाऱ्या दरात हृदयविकारावरील उपचार वर्षभर करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे सीईओ जशनजीत सिंग यांनी सांगितले.

तुली इंटरनॅशनल हॉटेलच्या पबवर (Pub) पोलिसांचा छापा

सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल पिंपरी- चिंचवड परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून हृदयविकारावरील सर्व उपचारांसाठी ( ऍन्जिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी) सर्वोत्तम असल्याचेही ते म्हणाले. शिबिरात रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. निखिल हिरेमठ, डॉ. सत्यजित सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. अजीज जेजुरकर, डॉ. सोनाली निराळी यांनी तपासणी केली.नियोजन  जशनजीत सिंग, मनोज मेनन, रइसा शेख, शिल्पा जोशी यांनी केले.