मनपा आवारातच मोकाट गुरांचा मुक्त संचार, मनपा अधिकारी ‘हतबल’

मनपा अधिकारी हतबल

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात मोकाट गुरांनमुळे नागरीक हैराण झाले आहे. मुख्य रस्तावर हि गुरे ठांण मांडुन बसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहनाचा अपघात होऊन नागरीक जखमी झाले आहे. रस्तावर मधोमध उभी राहत असलेली गुरे वाहनधारक यांना वळसा मारुन जोराने पुढे सरकतात. त्यात समोरुन येणाऱ्या वाहनांची धडक होते. त्या दोंघांचे रस्तावरच भांडण सुरु होते. यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होते. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

मोकाट गुरे हि मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयातील बगीच्यात शिरुन तेथील बगिचा, वृक्षरोपण केलेली झाडे हि तोडुन टाकत आहे. मनपा आवारात तर हि गुरे नविन तयार केलेला बगीचा नष्ट करत होती. कुठला ही गार्ड तिथे त्यांना हटकण्यासाठी नसल्याने बगीचाचे नुकसान झाले आहे.

मोकाट गुरे समस्या बाबत शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी शहरातील रस्तावर फिरणारी गुरे एकञ जमा करत मनपा आवारात आणून बांधली होती. जिल्हाधिकारी यांनी मोकाट गुरे बाबत बैठकीत अधिकारी यांची कान उघडणी केली होती.परंतु याकडे अधिकारी यांनी कानाडोळाच केला आहे.

मोकाट गुरे मनपा आवारात मुक्त संचार करत चरत आहे. मोकाट गुरे समस्या भिषण झाली आहे.मोकाट गुरे सोडणारे मालकावर गुन्हे दाखल करणार असे मनपा प्रशासनाने सांगितले होते. त्याला हि केराची टोपली दाखविल्या साऱखेच झाले आहे.मनपा आवारात मोकाट गुरे मनपाला एक प्रकारे घरचा आहेर आहे. अशी प्रतिक्रीया नागरीकांनी व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त