Corona Vaccination : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 18 ते 44 वर्ष वयोगटातील सर्वांना मिळणार मोफत कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने भारतात १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली. यावरून अनेक राज्यांनी १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला. परंतु महाराष्ट्रात त्याचा अजून निर्णय झाला नव्हता. आता मात्र महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आज याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लसीकरण करण्यासाठी राज्याला साडे सहा हजार कोटी लागणार आहे. तर जवळपास लसींचे १२ कोटी डोस लागणार आहेत. या दरम्यान, मोफत लसीकरण करणं यावर अजून ठाकरे सरकारकडून निर्णय घेण्यात आला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी कालच याबाबत संकेत दिले होते. उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मोफत लसीकरणाचा निर्णय होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. यावरून अखेर मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.