Fact Check : खरंच भारत सरकार 3 महिन्यांसाठी 10 कोटी युजर्संना फ्री इंटरनेट देणार? जाणून घ्या ‘सत्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडिया आजच्या काळात माहितीचे एक मोठे माध्यम बनले आहे. मात्र, माध्यमाची विश्वासार्हता सतत कमी होत आहे, कारण चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार १० कोटी युजर्संना मोफत इंटरनेट देणार आहे. सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. जर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी Fact Check https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः [email protected] वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक Fact Check टीमने हे स्पष्ट केले आहे की, हा फेक मेसेज म्हणजेच सरकारची अशी कोणतीही योजना नाही की जी मोफत इंटरनेट देण्यात येईल. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार १० कोटी युजर्संना तीन महिन्यांकरिता विनामूल्य इंटरनेट सुविधा पुरवित आहे. PIB Fact Check: हा दावा आणि लिंक बनावट आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही. अशा बनावट वेबसाइटपासून सावध राहा.”

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत