31 जानेवारीपर्यंत ‘फ्री’मध्ये बुक करू शकता LPG सिलेंडर, जाणून घ्या या खास ऑफर

नवी दिल्ली : जर तुम्हाला सुद्धा एलपीजी सिलेंडर एकदम फ्रीमध्ये बुक करायचा असेल तर तुमच्याकडे एक शानदार संधी आहे. 31 जानेवारीपूर्वी एलपीजी बुक केल्यास फ्रीमध्ये तुम्हाला घरी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी मिळू शकते. या खास ऑफर अंतर्गत जेवढे रूपये तुमच्या गॅस सिलेंडरची किंमत असेल तेवढे पैसे तुम्हाला परत पाठवले जातील. मोबाइल वॉलेट प्लेटफॉर्म Paytm आपल्या ग्राहकांना ही ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना केवळ एकदा पेटीएमद्वारे गॅस सिलेंडर बुक करावा लागेल. पेटीएमची ही ऑफर सर्व कंपन्यांच्या गॅस कनेक्शनवर मिळेल.

या ऑफरचा फायदा केवळ त्या लोकांना दिला जाईल जे लोक पहिल्यांदा पेटीएमवरून गॅस सिलेंडरची बुकिंग करत आहेत. ऑफरचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम मोबाइलमध्ये पेटीएम अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. याद्वारे सिलेंडर बुक केल्यास मोठी कॅशबॅक मिळू शकते. हा लाभ पहिल्याच बुकिंगवर मिळणार आहे.

कॅशबॅकसाठी या स्टेप्स करा फॉलो
* फोनमध्ये पेटीएम अ‍ॅप नसेल तर ते अगोदर डाऊनलोड करा.
* आता फोनवर पेटीएम अ‍ॅप उघडा.
* यानंतर recharge and pay bills वर जा.
* आता book a cylinder ऑपशन उघडा.
* भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमपैकी तुमचा गॅस प्रोव्हायडर निवडा.
* रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा आपल्या LPG ID नोंद करा.
* यानंतर पेमेंट ऑपशन दिसेल.
* आता पेमेंट करण्यापूर्वी ऑफरवर FIRSTLPG प्रोमो कोड टाका.

लाभ घेण्यासाठी या आहेत अटी
* बुकिंग अमाऊंट 500 रुपयांच्या वर असावी.
* ही ऑफर केवळ 31 जानेवारीपर्यंत लागू आहे.
* पेमेंट केल्यानंतर एक स्क्रॅच कुपन मिळेल. हे कुपन बुकिंगच्या 24 तासांच्या आत मिळेल. हे कुपन 7 दिवसांच्या आत उघडावे लागले. यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये कॅशबॅक होईल.