‘मला कोअर कमिटीतून मुक्त करा’, मुंडे साहेबांच्या नावाने कार्यालय सुरु करून राज्यभर दौरा करणार

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून होते. मेळाव्याच्या सुरुवातीला भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, पराभवाने खचून जाणारी मी नाही अशी गर्जना पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मीडियाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करत ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपत घेतली त्यावेळी तुमचे सूत्र कुठे होते असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केले.

मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते मात्र माझा पराभव कसा झाला यावर आता पुस्तक लिहावे लागेल असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आता माझ्याकडे कोणतेही पद नाही. मी आमदार देखील नाही त्यामुळे पक्षाने मला कोअर कमिटीतुन मुक्त करावे अशी मागणी यावेळी पंकजा मुंडे यांनी केली.

मी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय सुरु करून नवीन वज्रमूठ तयार करणार आहे मी मशाल घेऊन ठिकठिकाणी राज्यभर दौरा करणार आहे अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.

मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास मृत्यू नंतर देखील सुरु आहे त्यामुळे पराभवाने मी खचून जाणार नाही असे देखील पंकजा मुंडे यावेळी कार्यकर्त्यांना म्हणाल्या तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली अशा घोषणा जोरदार घोषणा दिल्या.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like