‘कोरोना’ लशीसाठी Co-WIN वर करावे लागेल रजिस्टर, जाणून घ्या ‘अ‍ॅप’ संदर्भातील सर्व गोष्टी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस व्हॅक्सीन विकसित करणार्‍या तीन कंपन्यांनी देशात व्हॅक्सीनच्य इमर्जन्सी वापरासाठी निवेदन केले आहे. लवकरच लसीकरण कार्यक्रम सुरू होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, कशाप्रकारे संपूर्ण लसीकरण कार्यक्रम चालवला जाईल. मात्र, कोणतीही तारीख ठरवण्यात आलेली नाही. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, केंद्र सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे, जे पूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे, सुरूवातीपासून शेवटपर्यंत. को-विन अपग्रेटेड अ‍ॅप आहे, जे मोफत डाऊनलोड करता येईल. को-विन, इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क (e-VIN) चे अपग्रेटेड व्हर्जन आहे.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, या अ‍ॅपने लसीकरणाची प्रक्रिया, प्रशासकीय क्रिया, लसीकरण कर्मचारी आणि त्या लोकांसाठी एका व्यासपीठासारखे काम करेल, ज्यांना व्हॅक्सीन दिली जाणार आहे. सरकार पहिल्या दोन टप्प्यात निवडक लोकांना व्हॅक्सीन देईल. यातील पहिल्या टप्प्यात सर्व फ्रंटलाईन हेल्थकेयर प्रोफेशनल्स आणि दूसर्‍या टप्प्यात आत्कालीन सेवांशी संबंधीत लोकांना व्हॅक्सीनचा डोस देण्यात येईल.

राज्य सरकार या लोकांचा डाटा जमा करण्याचे काम करत आहेत. तिसर्‍या टप्प्यात त्या लोकांना व्हॅक्सीन दिली जाणार आहे, जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. यासोबतच सेल्फ रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल. सेल्फ रजिस्ट्रेशन को-विन अ‍ॅपद्वारे करता येईल.

मंत्रालयानुसार को-विन अ‍ॅपमध्ये 5 मॉड्यूल आहे. पहिले प्रशासनिक, दुसरे रजिस्ट्रेशन, तिसरे व्हॅक्सीनेशन, चौथे लाभान्वित स्वीकृती आणि पाचवे रिपोर्ट मॉड्यूल आहे. वृत्तानुसार, एका व्यक्तीच्या लसीकरणात 30 मिनिटांचा वेळ लागेल आणि प्रत्येक सेशनमध्ये 100 लोकांना व्हॅक्सीन दिली जाईल. प्रशासनिक मॉड्यूल त्या लोकांसाठी आहे जे लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करतील. या मॉड्यूलद्वारे ते सेशन ठरवू शकतील, ज्या द्वारे लस देणारे लोक आणि व्यवस्थापकांना नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळेल.

रजिस्ट्रेशन मॉड्यूल त्या लोकांसाठी असेल जे लसीकरण कार्यक्रमासाठी आपले रजिस्ट्रेशन करतील. या मॉड्यूलद्वारे मोठ्या संख्येने माहिती अपलोड करता येईल. सोबतच स्थानिक प्रशासन आणि सेवाकर्त्यांद्वारे गंभीर आजाराशी संबंधित एकत्रित डाटा अपलोड केला जाईल.

व्हॅक्सीनेशन मॉड्यूल त्या लोकांची माहिती व्हेरिफाय करेल, जे लस घेण्यासाठी आपले रजिस्ट्रेशन करतील आणि याबाबत स्टेटस अपडेट करतील. लाभान्वित स्वीकृती मॉड्यूलद्वारे लसीकरणाच्या लाभान्वित लोकांना मॅसेज पाठवले जातील. सोबतच याद्वारे क्यूआर कोडसुद्धा जनरेट होईल आणि लोकांना व्हॅक्सीन घेतल्याचे ई-प्रमाणपत्र मिळेल.

रिपोर्ट मॉड्यूलद्वारे लसीकरण कार्यक्रमाशी संबंधी रिपोर्ट तयार होईल, जसे की, लसीकरणाची किती सेशन झाली, किती लोकांना लस दिली. किती लोकांनी रजिस्ट्रेशन करूनही लस घेतली नाही. या अ‍ॅपद्वारे त्या कोल्ड स्टोरेजच्या तापमानाचा रियल डाटासुद्धा उपलब्ध होईल, जिथे व्हॅक्सीनचे डोस स्टोअर करण्यात आले आहेत.