मोफत पेट्रोल, डिझेल… आठवलेंचा माफीनामा

मुंबईः वृत्तसंस्था

‘मंत्री असल्याने पेट्रोल आणि दरवाढीचा फटका बसलेला नाही. कारण मला सगळचं मोफत मिळतं. माझं मंत्रीपद गेलं तर मात्र मला त्याची झळ बसेल’, असं वक्तव्य आठवलेंनी केलं होतं. या वक्तव्यानंतर आठवलेंवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर इंधन दरवाढीवरील वक्तव्यावर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंनी माफी मागितली आहे.

[amazon_link asins=’B07G26PLDJ,B07811ZTKF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’303c5394-b9b1-11e8-a716-c3d718d226f9′]

आपल्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मीही एक सामान्य आहे आणि आता मंत्री झालोय इतकचं. सामान्यांच्या समस्या मी जाणतो. मी सरकारमध्ये आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करायला हवी, अशी मागणी करत आठवलेंनी जनतेची माफी मागितली.

पेट्रोल, डिझेल दरवाढीची तुम्हाला झळ बसली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. ‘आपल्याला कुठलाही फटका बसलेला नाही. कारण मी मंत्री आहे. सरकार आपल्याला सुविधा पुरवतं, पण पेट्रोल, डिझेलचे दर कमी करायला हवेत, असं उत्तर आपण दिल्याचं आठवले म्हणाले. तसंच आठवलेंनी जनतेची माफी मागत वादावर पडदा टाकलाय.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी