रेशन कार्डधारकांना आणखी 3 महिने मिळू शकतं मोफत रेशन, सरकार करू शकते ‘घोषणा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मोफत रेशन देण्याची योजना आणखी 3 महिन्यांसाठी वाढवण्याची विनंती 10 राज्यांनी केली आहे. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी या गोष्टीचे संकेत दिले आहे. बैठकीत अनेक राज्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत रेशनची मुदत वाढविण्याची विनंती केली. सर्व राज्यांची विनंती पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आली असल्याची माहिती रामविलास पासवान यांनी दिली आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकार राज्यांच्या विनंतीवर विचार करीत आहे.

आतापर्यंत 10 राज्यांनी केली विनंती

रामविलास पासवान म्हणाले की, आतापर्यंत 10 राज्यांनी मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढवण्याची विनंती केली आहे. ज्या राज्यांनी याबाबत पत्रे लिहिली आहेत त्यात आसाम, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, तामिळनाडू, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. विनंती करणाऱ्या राज्यांनुसार, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या मोफत रेशनमुळे लॉकडाऊन दरम्यान गरिबांना बराच फायदा झाला आहे. बैठकीत कॉंग्रेस शासित छत्तीसगडसारख्या राज्यानेही केंद्र सरकारचे आभार मानले आणि ही योजना गरिबांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे वर्णन केले.

लॉकडाऊनमध्ये झाली होती सुरू योजना सुरू

मोफत रेशन योजना पुढे वाढवण्याचा निर्णय घेतल्यास कॅबिनेटच्या मंजुरीची आवश्यकता असेल. एप्रिल, मे आणि जूनमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्व 81 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य व डाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन सुरू झाल्याच्या आठवड्यातच ही योजना जाहीर करण्यात आली. यापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेव्यतिरिक्त लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात आले आहे. मोफत रेशन योजनेंतर्गत गहू, तांदूळ आणि एक भरडधान धान्य स्वस्त दरात लाभार्थ्यांना दिले जाते.