Freelance Professionals | फ्रीलान्स करत असाल काम तर द्यावा लागू शकतो GST, जाणून घ्या या आवश्यक तरतूदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Freelance Professionals| बदलणार्‍या वर्क कल्चरमध्ये फ्रीलान्स काम वेगाने लोकप्रिय होत आहे. आज फ्रीलान्स प्रोफेशनल (Freelance Professionals) प्रत्येक क्षेत्रात मोठ्या संख्येने आहेत आणि मोठी कमाई करत आहेत. फ्रीलान्समधून होणारी कमाई सामान्यपणे लोक टॅक्स फ्री मानतात. मात्र, हे खरे नाही. फ्रीलान्स काम करणार्‍या प्रोफेशनलला काही बाबतीत जीएसटी (GST) भरावा लागू शकतो.

जीएसटी कायदा (GST Law) पाहिला तर या नावानेच सेवा म्हणजे सर्व्हिस (Service) जोडले आहे.
सध्याच्या कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे की, जर कुणी व्यक्ती कर योग्य सर्व्हिस देत आहे तर त्यास आपल्या राज्यात जीएसटी अंतर्गत नोंदणी करावी लागेल.
ही तरतूद त्यांच्यावर सुद्धा लागू आहे, जे फ्रीलान्स सर्व्हिस (Freelance Professionals) देतात.

कोणत्या Freelance Professionals द्यावा लागतो GST

कोणताही फ्रीलान्स प्रोफेशनल, ज्याचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्याला जीएसटी द्यावी लागतो.
पूर्वोत्तर राज्यांच्या प्रकरणात टर्नओव्हरचे हे लिमिट 10 लाख रुपये आहे. या कक्षेत येणार्‍या सर्व फ्रीलान्स प्रोफेशनलवर 18 टक्केच्या दराने जीएसटी द्यावा लागेल.

जीएसटी भरल्यास होणार नाही Freelance कमाईवर परिणाम

जर तुम्ही जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत फ्रीलान्सर आहात तर अशा प्रकरणात जीएसटी त्या पार्टीकडून वसूल केला जातो, जिला तुम्ही सर्व्हिस देत आहात.
कारण जीएसटी कायद्यात इनपुट टॅक्स क्रेडिटची तरतूद केली आहे, तुम्ही यावर नंतर क्लेम करून परत मिळवू शकता.
यामुळे तुमच्या कमाईवर कोणताही परिणाम होणार नाही.
फरक केवळ इतकाच असतो की पैसे परत मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो.

जीएसटी नोंदणी न केल्यास नुकसान

टॅक्स वाचवण्यासाठी कामाची सुरूवात करतानाच नेहमी दोन्ही बाजू जीएसटी न भरण्यावर सहमत होतात. काही प्रकरणात असे होत नाही.
विशेषता जर फ्रीलान्स प्रोफेशनल एखाद्या इंडिव्हिज्युअलऐवजी एखाद्या कंपनीला सर्व्हिस देत असेल तर अशा प्रकरणात कंपनी जीएसटी कापून आपल्याकडून सरकारकडे जमा करते.

अशा प्रकरणात त्या फ्रीलान्स प्रोफेशनलचे नुकसान होते, ज्यांच्याकडे जीएसटी नोंदणी नाही.
विना जीएसटी नोंदणी इनपुट टॅक्स क्रेडिटचा क्लेम करणे शक्य नाही.
तर, जे फ्रीलान्स प्रोफेशनल नोंदणीकृत असता, ते नंतर आयटीसी क्लेम करून पैसे परत मिळवू शकतात.

 

Upwork/Freelancer सारख्या प्लेटफॉर्मवरून काम करणार्‍यांचे नुकसान

फ्रीलान्स कामाच्या वाढत्या लोकप्रियतेने अनेक ऑनलाइन मार्केटप्लेसला उभारी दिली आहे. अपवर्क आणि फ्रीलान्सर असे मंच आहेत.
हे मंच सर्व्हिस देणार्‍या फ्रीलान्सर आणि काम करणार्‍यांमध्ये मध्यस्थाचे काम करतात.

कारण ऑनलाइन मार्केटप्लेसवर जीएसटीच्या अतिरिक्त तरतुदी लागू असतात, ही सर्व्हिस देणारे फ्रीलान्सरकडून सुद्धा सुरूवातीलाच एक टक्का टीसीएस कापून घेतात.
यासाठी फ्रीलान्सर आयटीसी क्लेम करू शकतात, ज्यांच्याकडे जीएसटी नोंदणी असते.

 

Web Title : Freelance Professionals | freelance professionals may have to pay gst must know these provisions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMC Lok Adalat | पुणे महापालिकेतील लोक अदालतीमध्ये 1369 केसेस निकाली; ‘इतक्या’ लाखाची थकित रक्कम वसुल

RBI Imposes Penalty | आरबीआयकडून मुंबईतील या बँकेला तब्बल 79 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

Rohit Pawar | हे योग्य नाही… रोहित पवारांचे आपल्याच सरकारला खडे बोल