शंकरपाळ्या नंतर आता साताऱ्याच्या दिक्षीचा सोशल मिडियावर धुमाकुळ, महाविद्यालयीन तरुणीमध्ये तुफान हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा येथील एका महाविद्यालयासमोर चक्क मुलींच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. तर ही फ्री स्टाइल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तेथील स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, त्यातील संबंधित त्या तरुणींना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून पालकां समोर चांगलीच समज देण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=DJmASvNvkuo&feature=youtu.be

याबाबत अधिक माहिती अशी, तेथील शहरातील एका महाविद्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. याचवेळी याचा व्हिडिओ काही मुलींनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. या प्रकरणाची निर्भया पथकातील महिला पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी संबंधित युवतींना पालकांसह बोलावून घेऊन त्यां तरुणीची विचारपूस करून, नेमकं कोणत्या कारणावरून हा वाद झाला याची माहिती घेतल्यानंतर त्यांना समज देण्यात आली आहे. यसेच यापुढे जर वाद केला गेला तर कारवाई करण्याचे त्या तरुणींना पोलसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दोन मुलींनी मागील आठवड्यातही एका मुलीला मारहाण केली होती. याचा व्हिडिओ ही व्हायरल झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. तर काही मुलींनी व्हॉट्सॲपला हा वादावादीचा व्हिडिओ स्टेट्स म्हणून ठेवला होता. अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.