कुस्तीगीर गीता फोगाटने आपल्या हातांनी उचलला जिवंत साप, व्हायरल झाला व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2010 मध्ये दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रकुल खेळात सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगाट आणि तिची बहीण बबिता फोगट हे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. लहान बहीण बबिता नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या विषयावर आपले मत व्यक्त करीत असते. मोठी बहीण गीतासुद्धा जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अलीकडेच गीताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती जिवंत साप पकडताना दिसत आहे. तिची पोस्ट खूप व्हायरल होत आहे. तिने हे कसे केले याबद्दल लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये काय आहे?
30 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून आपल्याला धक्का बसेल. गीता एका नदीच्या काठावर उभी आहे. तिथे कोरड्या पानांमध्ये रेंगाळणारा एक साप पुढे सरकत आहे. अचानक ती त्याला हातांनी पकडते आणि मग ती त्याला घेऊन पळते. जिवंत साप पकडल्यानंतर ती खूप उत्साहित दिसत आहे.

गीताची शानदार कारकीर्द
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या गीताने दोनदा आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकेही जिंकली आहेत. बॉलिवूड सुपरस्टार आमीर खानने फोगाटच्या कुटुंबावर आधारित ‘दंगल’ हा चित्रपट बनविला होता. जो बर्‍यापैकी यशस्वी झाला होता. या चित्रपटात गीताचे वडील महावीर सिंगची भूमिका आमीरने साकारली होती.