फ्रीज, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव लवकरच महागणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उर्जा वाचवणाऱ्या उपकरणांवर काही नियम केंद्र सरकार लागू करीत असल्याने या उपकरणांच्या किंममतीत सुमारे ८ ते १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. उर्जा वाचवणारे म्हणजेच एनर्जी एफिशिएंट असे मायक्रोवेव ओव्हन, वॉशिंग मशीन नोव्हेंबरपासून महागणार असून जानेवारीपासून फ्रीजही महागणार आहे.

एनर्जी एफिशिएंट उपकरणांवर एप्रिल २०१९ पासून काही निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. साधारणता ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर स्टार्स असतात ते कमी वीज घेतात. त्यामुळं वीज बील कमी येते. केंद्र सरकारनं निर्बंध लागू केले असल्याने त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आणि त्यामुळेच त्यांच्या qकमती वाढणार आहे. लागू करण्यात आलेले हे निर्बंध २०२० पर्यंत ऐच्छिक तर सन २०२१ पासून ते निर्बंध बंधनकारक आहेत. त्यामुळे कंपन्यांनी त्यांच्या उपकरणांच्या किंमती वाढवल्या आहेत. साधारणता फ्रीज, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव ओव्हनच्या किंमतीमध्ये ८ ते १० टक्क्यांनी वाढ होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –