दिल्ली – NCR मध्ये थंडीसह प्रदूषणाची पातळी ‘गंभीर’ स्तरावर, ‘AQI’ 400 च्या वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवेचा वेग कमी झाल्याने पुन्हा एकदा दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. शनिवारी गुरूग्राम वगळता दिल्ली व त्याजवळच्या शहरात हवेचा गुणवत्ता सुचकांक म्हणजेच एक्यूआय 400 च्या वर होता. तर सर्वाधिक प्रदूषित शहर फरीदाबाद आहे. नोएडा व ग्रेटर नोएडा दुसर्‍या क्रमांकावर होते. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण महामंडळाचा अंदाज आहे की, 31 डिसेंबरनंतर हवा वाहण्याचा वेग वाढल्यानंतर प्रदूषण कमी होऊ शकते. तोपर्यंत अशीच गंभीर स्थिती राहणार आहे.

हवामान विभागानुसर, सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये हवा कमी वेगाने वाहत आहे. शनिवारी हवेचा वेग 10 किमी प्रति तासापेक्षा कमी होता. तापमान कमी झाल्यानेही प्रदूषण वाढले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये निर्माण होणारे प्रदूषण येथील हवेत पसरले आहे. सीपीसीबीनुसार शनिवारी सर्वात जास्त प्रदूषित शहर फरीदाबाद होते. तेथील एक्यूआय 447 नोंदविण्यात आला आहे.

नोएडा व ग्रेटर नोएडाचा सूचकांक 442 होता. गाझियाबादचा एक्यूआय 430 आणि दिल्लीचा 407 होता. गुरुग्राममध्ये एक्यूआय 303 नोंदविण्यात आला.