‘मिलिट्री डे परेड’ मध्ये ‘मास्क’ न परिधान करता पोहोचल्या फ्रेंचच्या ‘या’ मंत्री, त्यानंतर हातांनी तोंडाला लपविले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाची भीती म्हणा की मग चूक लक्षात येणे, फ्रान्समध्ये अशीच एक बाब समोर आली जिथे देशाच्या एका मंत्र्यांना मास्क न लावल्यामुळे आपल्या हातांनी तोंड लपवावे लागले. खरंतर, उद्योग मंत्रालयाच्या ज्युनियर मंत्री अ‍ॅग्नेस पन्नियर-रनर बॅस्टील डे सैन्य परेडसाठी पॅरिसमधील प्लेस डे ला कॉनकॉर्ड येथे त्यांच्या कारने पोहोचल्या. तिथे पोहोचल्यानंतर त्या घटनास्थळी उपस्थितधिका ऱ्यांना भेटायला लागल्या, तेव्हा अचानक त्यांना समजले की त्यांच्याशिवाय सर्वांनीच आपल्या तोंडावर मास्क लावले आहे.

यानंतर, मंत्री ताबडतोब आपल्या कारच्या दिशेने पळाल्या, त्यांनी तोंडाला हाताने लपविले, परंतु तोपर्यंत त्यांची गाडी तेथून निघून गेली होती. हे पाहून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना इशारे करून आपल्या मास्कविषयी सांगितले. काही क्षणानंतर, एका अधिकाऱ्याने त्यांना एक अतिरिक्त मास्क आणून दिला आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ होण्यापासून वाचवले.

विशेष म्हणजे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी आणि अगदी बाहेरही जेव्हा शक्य असेल तेव्हा मास्क घालायला प्रोत्साहित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे याचा सुरुवातीच्या चरणात समावेश केला आहे आणि लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे सतत आवाहन केले जात आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक नेत्यांनी मास्क न घातल्याबद्दल जगभरात त्यांच्यावर टीका केली गेली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like