धक्कादायक ! हस्तांदोलन करताना चक्क राष्ट्राध्यक्षांच्या कानाखाली वाजवली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल (व्हिडीओ)

पॅरीस : वृत्तसंस्था – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (french president) इमॅन्युएल मॅक्रॉन (President of France Emmanuel Macron) यांना एका व्यक्तीने चापट (Slap) लगावली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना तात्काळ अटक (Arrested) केली आहे. राष्ट्रपती (french president) इमॅक्युएल मॅक्रॉन यांना फ्रान्सच्या दक्षिणेकडील दौऱ्यात एकाने चापट मारली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात (Social media) प्रचंड व्हायरल झाला आहे. आपल्या दौऱ्यावर असताना मॅक्रॉन तेथे उपस्थित असलेल्या लोकांशी हात मिळवण्यासाठी गेले असता एकाने त्यांच्या कानाखाली लगावली. देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती विरोधात आंदोलन करणे, रोष व्यक्त करणे हे लोकशाही देशात चालते. परंतु थेट सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला चापट मारणे हे नवीनच आहे.

हस्तांदोलन करताना हात उगारला
जनतेशी थेट संवाद साधायचा कार्यक्रम असेल तेव्हा त्याला वॉक अबाऊट असे म्हटले जाते.
फ्रान्सचे अध्य मॅक्रॉन यांच्या अशात Walk About दरम्यान हा विचित्र प्रसंग घडला.
सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षांशी या व्यक्तीने हस्तांदोलन केलं आणि नंतर थेट हात उगारला.
काही समजायच्या आत त्याने मॅक्रॉन यांच्या गालावर चापट लगावली.
हा प्रकार दक्षिण फ्रान्सच्या ड्रोम प्रांतात घडला आहे.

तात्काळ दोघांना अटक
घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सुरक्षा पथकाने त्या व्यक्तीला लगेच ताब्यात घेतले.
आणि मॅक्रॉन यांना तेथून दूर नेले. बीएफएम टीव्ही आणि आरएमसी रेडिओनुसार या घटनेसंदर्भात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या हिरवा टीशर्ट मधील व्यक्तीने Down with Macronia (A Bas La Macronie) अशी घोषणा देत अध्यक्षांवर हात उगारल्याचे सांगण्यात येत आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

PM मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी साधला निशाणा, म्हणाले…

 

संतापजनक ! 70 वर्षाच्या नराधमाकडून 10 वर्षाच्या मुलीवर घरात घुसून लैगिंक अत्याचार, कोंढव्यातील घटना