Frequent Urination | वारंवार लघवी येणं असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा संकेत ! चुकूनही करू नका दुर्लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Frequent Urination | पाणी प्यायल्यानंतर काही वेळाने लघवी होणे ही सामान्य गोष्ट आहे. याशिवाय काही लोक दिवसातून 3-5 वेळा लघवीला जातात. परंतु अनेकांना दिवसातून अनेकदा लघवी होत असल्याचे जाणवते. काही शारीरिक समस्यांमुळे (Physical Problem) वारंवार लघवी होऊ शकते. म्हणजेच, वारंवार लघवीला (Frequent Urination) जाणे हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. तुम्हाला सुद्धा वारंवार लघवीला जाण्याची समस्या (Frequent Urination Problem) असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे.

 

वारंवार लघवी होणे म्हणजे काय (What Is Frequent Urination)
जर एखादी व्यक्ती 24 तासांच्या कालावधीत वारंवार लघवीला जात असेल तर त्याला वारंवार लघवी करण्याच्या श्रेणीत ठेवले जाते. अहवालानुसार, जर एखादी व्यक्ती 24 तासांत 8 किंवा त्याहून अधिक वेळा लघवीसाठी (Urine) गेली तर तो या श्रेणीत येतो. वारंवार लघवी होण्याची काही कारणे असू शकतात.

 

वारंवार लघवी (Frequent Urination) केल्याने झोप कमी होते. युरिनने भरलेल्या ब्लॅडरमुळे (Bladder) तुम्ही रात्रभर झोपू शकत नाही आणि तुम्ही जागे राहता. या स्थितीला निक्टुरिया (Nocturia) म्हणतात. अनेक प्रकरणांमध्ये, डॉक्टरांचा सल्ला घेऊन या समस्येवर मात करता येते.

 

वारंवार लघवीला होण्याची कारणे (Causes Frequent Urination)
वेगवेगळ्या स्थिती असतात ज्यामुळे वारंवार लघवी होते. यापैकी बरेच घटक तुमचे वय, लिंग किंवा शक्यतो दोन्हीवर आधारित असतात. कदाचित, वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात ही समस्या अनेकदा आली असेल. ही स्थिती किरकोळ आणि मॅनेज करण्यासारखी सोपी असू शकते. परंतु काही स्थितींमध्ये ती गंभीर असू शकते.

1. यूरिनरी ट्रॅक आणि ब्लॅडरची स्थिती (Urinary Tract And Bladder Positions) :
यूरिनरी ट्रॅक (Urinary Tract) आणि ब्लॅडरची स्थिती ही वारंवार लघवी होण्याची सर्वात सामान्य स्थिती आहे. या स्थितीत युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) झाल्यामुळेही समस्या उद्भवू शकते. यूटीआय (UTI) दरम्यान, बाह्य संसर्ग शरीरात प्रवेश करतो आणि तुमच्या मूत्रमार्गात सूज येते. अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये, वारंवार लघवी होणे हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

 

2. मधुमेह (Diabetes) :
वारंवार लघवी होणे हे मधुमेहाचे एक सामान्य लक्षण आहे. तुम्हाला टाइप 1 (Type 1 Diabetes) किंवा टाइप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) असल्यास, ही समस्या असू शकते.

 

3. प्रोस्टेट समस्या (Prostate Problems) :
प्रोस्टेट (Prostate) ही गोल्फ-बॉल आकाराची ग्रंथी आहे, जी स्खलनादरम्यान काही द्रव पदार्थ बनवते. तुमचे प्रोस्टेट शरीराबरोबरच वाढते, परंतु त्याचा आकार जास्त वाढल्यास समस्या निर्माण होऊ शकते. वाढलेले प्रोस्टेट तुमच्या यूरिनरी सिस्टमवर (Urinary System) दबाव आणू शकते आणि वारंवार लघवी होऊ शकते.

 

4. इतर कारणे (Other Causes) :
– स्ट्रोक (Stroke)
– प्रेग्नंसी (Pregnancy)
– पेल्विक ट्यूमर असणे (Pelvic Tumor)
– लघवीचे प्रमाण वाढवणार्‍या औषधांचा वापर
– खूप जास्त अल्कोहोल (Alcohol) किंवा कॅफीन (Caffeine) पिणे

वारंवार यूरिनेशन कसे कंट्रोल करावे (How To Control Frequent Urination) :
जर कुणाला वारंवार लघवी येण्याची समस्या असेल तर त्याने आपल्या जीवनशैलीत काही बदल करावेत.
यासोबतच हे सुधारण्यासाठी औषधांशिवाय काही पद्धतीही अवलंबल्या पाहिजेत.

 

– झोपण्यापूर्वी द्रव पदार्थ (Liquid) पिऊ नका.
– अल्कोहोल आणि कॅफिनचे प्रमाण मर्यादित करा
– पेल्विक मसलच्या मजबूतीसाठी केगल व्यायाम (Exercise) करा. हे स्नायू तुमची मूत्रमार्ग मजबूत करतात.
– तुम्ही असे कोणतेही औषध घेत असाल, ज्यामुळे शरीरातील द्रव बाहेर काढून टाकले जाते, तर त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Frequent Urination | frequent urination causes reason symptoms treatment how to control or stop frequent urination diabetes prostate problems pregnancy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol Control Diet | कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

 

Mhada Exams Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात 3500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

 

Kidney Cure | हाय बीपी, पोटात वेदना आणि सूज दिसून आली तर असू शकतो किडनीसंबंधी ‘हा’ गंभीर आजार; जाणून घ्या