वेस्टइंडीज दौऱ्यावर नवीन खेळाडूंना संधी, ‘हे’ खेळाडू ‘बाहेर’ ! (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहे. १९ जुलै रोजी या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. वर्ल्डकपमधील सेमीफायनल सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे.

या दौऱ्यात कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना आराम दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याला देखील आराम दिला जाऊ शकतो. धोनी लवकरच निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या विंडीज दौऱ्यात भारतीय संघात नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी आणि आवेश खान यांचा समावेश आहे. चहरने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत १७ सामन्यांत २२ विकेट घेतल्या होत्या. तर फिरकीपटूंमध्ये राहुल चहर, मयंक मारकंडे आणि श्रेयस गोपाल यांचा विचार केला जाऊ शकतो. फलंदाजांमध्ये शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना संधी मिळू शकते. या आयपीएलमध्ये शुभमन गिल याने शानदार कामगिरी करत २९६ धावा बनवल्या होत्या.
दरम्यान, एकदिवसीय आणि टी-२० मालिका झाल्यानंतर २२ ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत असून या मालिकेत कोहली आणि बुमरा पुन्हा संघात प्रवेश करू शकतात. हे दोन कसोटी सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असल्याने हे दोघे या सामन्यांत खेळणार असल्याचे समजते.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी