शुक्रवारी घरात असणार्‍या ‘मनी प्लॅन्ट’च्या रोपाला आवश्यक बांधा ‘ही’ गोष्ट, प्रत्येक संकट होऊ शकतं दूर, पैशांची देखील नाही भासणार कमतरता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सर्वसाधारणपणे तुम्हाला मनी प्लांट (Mani Plant) सर्व लोकांच्या घरात किंवा घराच्या बाहेर लावलेली दिसेल. मनी प्लांटच्या वनस्पतीला घराच्या समृद्धीशी जोडले जाते. श्रद्धेनुसार घरात ज्याच्याकडे ही वनस्पती आहे त्याला पैशांसंबंधित समस्या उद्भवत नाही. परंतु बर्‍याच वेळा याच्या उलट देखील पाहिले जाते.

कधीकधी असे देखील पाहिले जाते की ज्यांनी ही वनस्पती लावली आहे त्यांच्या घरात पैशांसंबंधित समस्या देखील उद्भवतात. म्हणजेच घरात मनी प्लांट लावण्याचा कोणताही फायदा होत नाही. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्वाचे आहे की घरात मनी प्लांट असूनही नेहमी पैशांसंदर्भात समस्या का उद्भवतात.

असे म्हणतात की मनी प्लांटची वनस्पती जितकी वाढते तितक्या प्रमाणात घरात पैसे येतात. परंतु मनी प्लांट लावण्यापूर्वी आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. याची योग्य देखभाल केली पाहिजे आणि ती योग्य प्रकारे घरात स्वच्छ ठिकाणी लावली पाहिजे. असे केल्याने घरात बरकत येते. शुक्रवारी मनी प्लांटच्या वर लाल रंगाचा धागा किंवा रिबिन बांधणे शुभ मानले जाते. वास्तविक लाल रंग प्रेम, स्नेह, प्रगती आणि प्रसिद्धी यांचा प्रतीक मानला जातो. म्हणूनच असे म्हटले जाते की लाल रंगाच्या रिबीनने वनस्पतीस बांधल्याने घरात सकारात्मकता येते. या सकारात्मकतेमुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते.

असा बांधा लाल धागा किंवा रिबिन…

– शुक्रवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करुन माता लक्ष्मीची पूजा करावी.

– त्यांच्यासमोर दिवा लावावा.

– लाल रंगाचा धागा किंवा रिबिनला माता लक्ष्मीच्या पायाजवळ ठेवावे.

– त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करावी आणि या लाल धाग्यावर किंवा रिबिनवर कुंकू लावावे.

– माता लक्ष्मीचे स्मरण करून मनी प्लांटच्या मुळाभोवती चारही बाजूंनी त्यास बांधावे.

– जर बाटलीमध्ये मनी प्लांट असेल तर बाटलीच्या खालच्या बाजूने या लाल धाग्यास बांधावे.

हे बांधल्यानंतरच आपल्याला काही दिवसांत फरक दिसून येईल. माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल आणि घरात पैशांची आवक येणे सुरु होईल.