… म्हणून मित्रांनीच केला मित्राचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राला पैशांची गरज असल्याने मैत्रिणीच्या नावावर असलेल्या फ्लॅटवर कर्ज घेऊन ते पैसे त्याला उसने दिले. परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने तगादा लावल्यावर ते पैसे परत मागणाऱ्या मित्रालाच जामखेड येथे नेऊन संपवले. त्यानंतर त्याचा मृतदेह जामखेड येथील सौताडा घाटात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकड पोलिसांनी एका मिसींगच्या तक्रारीचा छडा लावत हा प्रकार उघडकिस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांन दोघांना अटक केली आहे.

दत्ता नवनाथ बिरंगळ (वय ३०, नेवाळे वस्ती, चिखली, मुळ गाव मु. पो. सोनेगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) व समाधान बिभीषण भोगल (वय २४ वर्षे, रा. जाधववाडी चिखली, मुळ रा. बोरगाव ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी तेजस सुनील भिसे (वय २८ वर्षे, रा. रहाटणी) याचा खून केला.

मित्रांसोबत गेला अन परत आलाच नाही
तेजस भिसे हा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचे काम करतो. तो कामानिमित्त धुळे, अमरावती, येथे जातो असे सांगून गेला. त्यानंतर त्याने मावस भाऊ नितेश अंबादास मोरे याला फोन करून सांगितले की, दत्ता बिरंगळ याच्यासोबत आहे. असे सांगून २० एप्रिल रोजी गेला तो परत आला नाही. त्यानंतर २१ एप्रिल रोजी त्याच्या व्हाट्स अ‍ॅप वरून नितेश भोरे .याला मेसेज आला की त्याची होंडा सिटी कार ही काळेवाडी येथील भोईर लॉन्स येथे आहे. त्यानंतर याप्रकरणी तेजसचा मोठा भाऊ प्रवीण भिसे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला.

पैसे परत देत नसल्याने होता वाद
बिरंगळ याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याला तेजसने एका मैत्रिणीच्या फ्लॅटवर कर्ज काढून त्याला पैसे दिले होते. परंतु बँकेकडून कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला जात असल्याने ते दोघे बिरंगळ याच्याकडे पैशांची मागणी करत होते. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होत. त्यामुळे तेजसचा घातपात केला असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बिरंगळ याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने भोगल याच्यासोबत मिळून खून केल्याचे कबूल केले. त्यांनी तेजसचा मृतदेह जामखेड येथील घाटात फेकून दिल्याचे सांगितले. आणि ती जागाही दाखवली.”

खून करून मृतदेह जामखेडजवळच्या सौताडा घाटात फेकला
तेजस भिसे याला बिरंगळ आणि त्याच्या साथीदाराने मिळून होंडा सिटी कारमध्ये जामखेड येथे नेले. त्यानंतर तेथे तेजसचा गळा आवळून खून केला आणि जामखेड हून अहमदनगरकडे जाणाऱ्या सौताडा घाटाता ६० फुट खाली फेकून दिला. त्यानंतर तेथे त्याचे कपडे, बेल्ट, शुज, आणि इतर साहित्य मौजे राजूरी येथे जाळले. पोलिसांनी तेजसचा मृतदेह तेथून ताब्यात घेतला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पंकज ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक हरिष माने, सिद्धनाथ बाबर, कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, दीपक भोसले, रमेश गायकवाड, जावेद पठाण, विजय गंभीरे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, नितीन गेंजगे, शाम बाबा, सुरेश भोसले, भैरोबा यादव, मयूर जाधव, सुरज सुतार य़ांच्या पथकाने केली.