पत्नीसोबत मित्राचं ‘लफडं’ असल्याचा संशय, पतीनं संपवलं त्याच आयुष्य

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीनगर भागात राहणार तुषार श्रीरंग पवार हा युवक ७ डिसेंबर रोजी रात्री घरी आला नाही म्हणून त्याच्या पालकांनी ८ डिसेंबर रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर तपास करताना पोलिसांनी तुषारच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन आणि कॉल डिटेल काढले असता दिलीप बळीराम मेटकर या तुषारच्या मित्राबाबत माहिती मिळाली.

दरम्यान तुषार पवारचा मृतदेह काकांडी शिवारात एका शेतकऱ्यास आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दिलीपला चौकशीसाठी बोलवले तर त्याने येण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी तुषारच्या मोबाईलचे लोकेशन तपासून त्याच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तुषार दिलीप सोबत गाडीवरून जात असताना त्यांना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दिलीपला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता आपणच तुषारला गळा दाबून ठार मारल्याचे दिलीपने कबुल केले.

पत्नीशी अनैतिक संबंधांच्या संशयावरून हत्या
आपल्या पत्नीचे आणि तुषारचे अनैतिक संबंध आहेत या संशयावरून आरोपी दिलीपने तुषारची हत्या केल्याचे उघड झाले. तुषार हा दिलीपचा मित्र आणि नातेवाईक देखील होता. याबाबत आणखी कोणी सह आरोपी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक काकडे हे करत आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like