Friendship Cup Organized By Puneet Balan Group | ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! तुळशीबाग टस्कर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज्, श्रीराम पथक संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Friendship Cup Organized By Puneet Balan Group | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत तुळशीबाग टस्कर्स (Tulshibagh Tuskers), शितळादेवी सुपरनोव्हाज् (Shitladevi Supernovaz) आणि श्रीराम पथक (Shriram Pathak) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. (Friendship Cup Organized By Puneet Balan Group)

 

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर महेंद्र भामरे याने केलेल्या ६० धावांच्या जोरावर तुळशीबाग टस्कर्स संघाने नादब्रह्म ड्रमर्स संघाचा ४० धावांनी पराभव केला. दुसर्‍या सामन्यात गणेश बानगवे याच्या ७२ धावांच्या जोरावर शितळादेवी सुपरनोव्हाज् संघाने रंगारी रॉयल्स् संघाचा २० धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. अजिंक्य गायकवाड याच्या अष्टपैलू खेळीमुळे श्रीराम पथक संघाने गरूड स्ट्रायकर्स संघाचा ४१ धावांनी पराभव करून विजयी सुरूवात केली. (Friendship Cup Organized By Puneet Balan Group)

 

स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) , आरएमडी फाऊंडेशनच्या (RMD Foundation) उपाध्यक्षा शोभा धारीवाल (Shobha Dhariwal), सिनेअभिनेते अंकूश चौधरी (Actor ankush choudhary), पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन (Punit Balan) आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन (Janhvi Dhariwal-Balan) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक यातील मान्यवर सदस्य व सहभागी संघांचे खेळाडू आदि उपस्थित होते.

 

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

१) तुळशीबाग टस्कर्सः ८ षटकात २ गडी बाद १११ धावा (महेंद्र भामरे ६० (२५, ६ चौकार, ४ षटकार), प्रदीप बांदल नाबाद १५, शुभम जैन १-२५, श्रेयस भंडारी १-१३) वि.वि. नादब्रह्म ड्रमर्सः ८ षटकात ८ गडी बाद ७१ धावा (अभिषेक राठोड ३८, महेंद्र भामरे २-१४, मिथुन चव्हाण २-२, नितीन पंडीत २-५); सामनावीरः महेंद्र भामरे;

२) शितळादेवी सुपरनोव्हाज्ः ८ षटकात ४ गडी बाद १०७ धावा (गणेश बानगवे ७२ (३०, ६ चौकार, ६ षटकार), सुजित धुमाळ १-१०) वि.वि. रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात ४ गडी बाद ८७ धावा (प्रफुल्ल मानकर ४६, पुनित बालन १०, आकाश निंबाळकर १-१७); सामनावीरः गणेश बानगवे;

३) श्रीराम पथकः ८ षटकात ५ गडी बाद ९३ धावा (अजिंक्य गायकवाड ३३,
निखील कटवाटे १४, आलोक जेंढे २-२६) वि.वि. गरूड स्ट्रायकर्सः
८ षटकात ७ गडी बाद ५२ धावा (अलोक जेंढे १९, सोमनाथ कांबळे १७, केतन काळे २-७,
अजिंक्य गायकवाड २-१३); सामनावीरः अजिंक्य गायकवाड;

Web Title :- Friendship Cup Organized By Puneet Balan Group | Friendship Cup Cricket Championship! Tulshibagh Tuskers, Shitladevi Supernovaz, Shriram Pathak teams celebrated the inaugural day


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कोर्स पूर्ण करुनही काम मिळत नसल्याच्या रागातून ‘फिल्म अ‍ॅकॅडमी’च्या संचालिकेला बेदम मारहाण, इन्स्टीट्युटची केली तोडफोड

Summer Weight Loss Tips | केवळ कडक उन्हापासूनच वाचवणार नाही, तर पोटाची चरबी आणि एक्स्ट्रा बॉडी फॅटसुद्धा कमी करतील ‘या’ 2 गोष्टी

Sainath Babar-Vasant More | पुणे मनसेच्या आजी-माजी शहराध्यक्षांची ‘चाय पे चर्चा’ ! वसंत मोरेंनी साईनाथ बाबर यांना दिल्या शुभेच्छा