#Friendship Day 2019 : ‘फ्रेंडशिप डे’चं पहिल्या महायुध्दाशी ‘कनेक्शन’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगात सर्वात सुंदर आणि खास नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं ! मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे. म्हणूनच मैत्रीचे प्रतिक म्‍हणून ‘फेंडशिप डे’ साजरा केला जातो. इतर सणवार तारखेनुसार किंवा तिथीनुसार साजरे केले जातात. मैत्रीचा सण मात्र ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. ‘फेंडशिप डे’ ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जाण्यामागे विशिष्ट कारण आहे. जुन्या मैत्रीला उजाळा द्यायचा असेल किंवा नवीन मैत्रीची सुरुवात करायची असेल तर ‘फ्रेंडशिप डे’ चा आधार घेतला जातो. आतुरतेने वाट पहिल्या जाणाऱ्या या दिवसाचा इतिहास जाणून घेऊयात –

‘फ्रेंडशिप डे’ चा इतिहास

भारतात अगदी अलिकडचे फ्रेंडशिप डे साजरा करायला सुरुवात झाली आहे. मात्र त्याचा इतिहास खूप जुना आहे. फ्रेंडशिप डेची सुरूवात सन १९१९ मध्‍ये हॉलमार्क कार्डचे संस्थापक ‘जॉएस हॉल’ यांनी केली असे मानले जाते.

मात्र औपचारिक स्‍वरूपात फ्रेंडशिप डेची सुरूवात अमेरिकी कॉंग्रेसद्वारा १९३५ मध्ये करण्यात आली. कारण पहिल्‍या महायुद्धानंतर लोकांच्‍या मनावर तिरस्‍काराची , असुरक्षिततेची आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी अमेरिकी सरकारने ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या रविवार‍ी फ्रेंडशिप डे साजरा करण्‍याचा निर्णय घेतला. इतर देशांनीही त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे लवकरच याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. राष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’चा प्रस्ताव १९५८ मध्ये ठेवण्यात आला होता. फ्रेंडशिप डे ला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रसिद्ध बँड बीटल्स ने १९६७ ला With Little Help From My Friends…. हे गाणे रिलीज केले होते. ते पूर्ण जगभरात गाजले होते.

काही देशांमध्ये मात्र फ्रेंडशिप डे वेगळ्या ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा न करता इतर दिवशी साजरा केला जातो. ८ एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ३० जुलै २०११ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा करण्यात आला होता. ब्राझील ,अर्जेंटीना, इक्वाडोर आणि उरुग्वे या देशांमध्ये २० जुलैला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

भारतीय संस्‍कृतीमध्‍ये मैत्रिचे उदाहरण म्हणून श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्‍या मैत्रीचा दाखल दिला जातो. टेक्नॉलॉजीच्या या युगात मैत्रीची परिभाषा बदलली आहे. मात्र असं जरी असलं तरी अनेकजण वेळात वेळ काढून आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटून हा विशेष दिवस साजरा करतात.

आरोग्यविषयक वृत्त –