फ्रेंडशिप डे : पंक्चरच्या दुकानात होते कामाला, मित्रांनी भरली फीस अन् बनलो IAS

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आज देशभरात फ्रेंडशिप डे (मैत्री दिवस) साजरा केला जात आहे. मित्र हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, जे आपल्याला प्रत्येक परिस्थतीत साथ देतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा आयएएस अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मित्रांनी कठीण काळात त्यांची फी भरली होती. ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांच्या मित्रांचा देखील हात आहे. आयएएस अधिकारी वरुण बर्नवाल, जे सायकल पंक्चरच्या दुकानात काम करायचे. वरुण हे महाराष्ट्रातील बोईसर या छोट्याशा शहरातील आहे. त्यांनी 2013 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत 32 वा क्रमांक मिळविला होता.

वरुणच्या घराची अवस्था तितकीशी चांगली नव्हती, बर्‍याचदा पैशाची कमतरता भासली. त्यांचे वडील सायकल पंक्चरिंगचे काम करायचे. जेव्हा दहावी पूर्ण झाली, तेव्हा मी मनातल्या मनात विचार केला होता की, मी सायकलच्या दुकानात काम करेन. कारण पुढील अभ्यासासाठी पैसे उभे करणे कठीण होते. वरुण यांनी 2006 मध्ये दहावीची परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर तीन दिवसांत वडिलांचा मृत्यू झाला. दहावीत त्यांनी टॉप केले होते. त्यानंतर आई म्हणाली- ‘तू अभ्यास कर आम्ही काम करतो.’ 11 वी -12 ची वेळ वरुणसाठी सर्वात कठीण होती. दहावीत प्रवेश घेण्यासाठी वरुणच्या घराजवळ एकच चांगली शाळा होती. परंतु त्यात प्रवेश घेण्यासाठी दहा हजार रुपयांच्या डोनेशनची आवश्यकता होती. त्यानंतर मी आईला सांगितले की, राहूदे पैसे नाहीत. मी 1 वर्ष थांबतो आणि पुढच्या वर्षी दाखला काढेन.

त्यानंतर डॉक्टरांनी माझी फी भरली, जे माझ्या वडिलांवर उपचार करत होते. वरुण म्हणाला, मी माझ्या अभ्यासावर 1 रूपयादेखील खर्च केलेला नाही. माझ्या मित्रांनी आणि त्यांच्या पालकांनी माझ्या महाविद्यालयाची फी भरली आहे, ज्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. वरूण यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यानंतर त्यांनी यूपीएससी फॉर्म भरला. प्रिलिम्सची तयारी करण्यासाठी त्याच्याकडे फक्त चार महिने होते. त्यानंतर त्याच्या भावाने त्याला मदत केली. जेव्हा यूपीएससी प्रीलिम्सचा निकाल आला तेव्हा त्यामध्ये वरुणचा क्रमांक 32 होता. वरुण आज यशस्वी झाले आहेत , परंतु मित्रांच्या मदतीशिवाय हे यश त्याच्यासाठी अशक्य होते.