‘एकनिष्ठ’ शिवसैनिकांचा स्नेह मेळावा

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पाथरीच्या वतीने शिवसेना पदाधिकारी स्नेह मेळावा रविवारी १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी उद्घाटक म्हणून खा. सजंय जाधव हे उपस्थित होते, तर मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जालना येथून शिवसेना उपनेते लक्षमण वडले हे उपस्थित होते. डॉ. जगदीश शिंदे यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित मेळाव्याला शिव सैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पदाधिकारी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित पक्ष पदाधिकारी यांना भगवा रुमाल घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पाथरी येथे सेलु काॅर्नर येथील एसबीआय बॅंकेच्या बाजूला शिवसेना संपर्क कार्यालयासमोर रविवारी दुपारी पार पडला. आयोजित मेळाव्यास पाथरी मतदारसंघातील शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.

आयोजित मेळाव्यास उपस्थित असलेल्या पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते लक्षमण वडले म्हणाले की, पाथरी विधानसभेची ही जागा पुर्वापार शिवसेनेची आहे. विरोधी पक्षाकडे निवडणूक लढविण्यास उमेद्वार नाही, तर इकडे इच्छुकांची गर्दी आहे. अजित पवारांवर त्यांनी मोठा सिंचन घोटाळा केला असल्याचा आरोप केला. त्यातून ते पूरग्रस्तांना मदत करत आहेत. मागील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वातावरण नव्हते तर केवळ अफवा होत्या असे त्यांनी सांगितले.

यावेळी विचार मंचावर खा. सजंय जाधव, जि. प. सदस्य विष्णु मांडे, माणिक घुंबरे, मुंजा कोल्हे, डॉ.राम शिंदे, प्राध्यापक पंढरीनाथ धोंडगे, जिल्हा प्रमुख सुरेश ढगे, उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, आदि उपस्थित होते. मंचावरील उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

पुढे बोलताना वडले म्हणाले कि, गाव खेड्यातील सामान्य शिव सैनिकांनी एकञ येऊन विजय खेचून आणला. पीक विमा, दुष्काळ, अशा अनेक मुद्यांवर सामान्यांसाठी उध्दव ठाकरे पुढे आले. कर्ज माफीही उध्दव ठाकरे यांच्या मुळेच मिळाली आहे असेही यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. आपला उमेदवार कोण ? शिवसेनेचा धनुष्यबाण असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना वडले म्हणाले कि, विधानसभेचे टिकीट देणे आमदार-खासदार, यांच्या हाती नाही, कोणाला द्यायचे हे उध्दव ठाकरे ठरवतील यासाठी पक्ष पातळीवर सर्वे केला जाणार आहे.

मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करताना डॉ.जगदीश शिंदे यांनी सांगितले की, अडी अडचण आल्यास सर्व सामन्यांनी शहरातील सेलु काॅर्नर येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. या पुढे पाथरी शहरात शिवसेना भवन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले एक गाव एक कुटुंब म्हणून एकञ येऊन हरवलेले अस्तित्व परत मिळवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला, उपस्थिताचे आभार मानले.

पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उपस्थित असलेले शिवसेना उपनेते लक्षमण वडले व खा.सजंय जाधव यांनी पुष्पगुच्छ व भगवा रुमाल घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रम यशस्वितेसाठी आविराज टाकळकर, बाळासाहेब अरबाड, संतोष जोगदंड, ए. एम. हारकळ, नामदेव शिंदे, रामेश्वर घटे, निकम आदींनी पुढाकार घेतला.

आरोग्यविषयक वृत्त