‘पावसासाठी’ लोकांनी लावलं ‘बेडूक – बेडकी’नीचं ‘लग्न’,आता पूर परिस्थितीमुळं केला ‘घटस्फोट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भोपाळमधील लोकांनी चांगल्या पावसासाठी बेडूक आणि बेडकीनीचे लग्न लावले आणि त्या परिणाम म्हणून चांगला पाऊस देखील झाला. परंतू आता त्यांना हे महागात पडले आहे. मध्यप्रदेशात पावसाने चांगलाच जोर धरल्यानंतर आता लोक अत्यंत त्रस्त झाले आहे, त्यामुळे आता अतिवृष्टी कमी व्हावी आणि पाऊस बरसायचा थांबावा यासाठी या लोकांना या बेडूक बेडकीनीचा घटस्फोट देखील घडवून आणला.

याला आपण अंधश्रद्धा म्हणून परंतू बेडूक बेडकीनीच लग्न लावल्यानंतर चांगलाच पाऊस झाला, एवढा झाला की पूरपरिस्थिती निर्माण झाली. राज्यात एवढे पाणी पाणी झाले की लोकांना भीती पोटी त्या बेडकांचा घटस्फोट घडवून आणला. अशी समज आहे की बेडूक बेडकींनी सोबत असल्याचे पाहिल्यास चांगला पाऊस होणार असतो.

जुलै महिन्यात लावले होते लग्न –
लोकांना दुष्काळाची चिंता होती. प्रत्येकजण पावसाची वाट पाहत होता, जो यंदा उशीरा आला. त्यामुळे लोकांनी पाऊस पडावा यासाठी 19 जुलैला बेडूक आणि बेडकीनीचे लग्न लावून दिले होते.
परंतू चांगलाच पाऊस झाल्याने अखेर लोक पावसाने त्रस्त झाले. त्यानंतर इंद्रपुरी भागातील ओम शिव सेवा शक्ती मंडळाने बुधवारी प्रतिकात्मक बेडूक आणि बेडकीनीचा घटस्फोट केला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like