1 एप्रिलपासून दूध, AC, TV सोबत ‘या’ गोष्टीही महागणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या १ एप्रिल महिन्यापासून सामन्यांवर चांगलाच आर्थिक बोजा पडणार असल्याचे दिसते. देशात सतत वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल इंधनच्या किंमती यामुळे सामान्यांना त्रास होत आहे. तर आत मात्र १ एप्रिलपासून दूध, एअर कंडिशनर (Air conditioner), पंखा, टीव्ही, स्मार्टफोन्सच्या दरात वाढ होणार आहे. तसेच विमान प्रवास, टोल करासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या

१ एप्रिलपासून दुधाच्या दरात ३ रुपयांनी वाढ होणार –
दुधाच्या दरात वाढ करण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी दुधाचे दर प्रति लीटर प्रमाणे ५५ रुपये इतकं वाढवण्याचं म्हटलं आहे. मात्र व्यापाऱ्यांनी ३ रुपये दर वाढवण्याचं म्हटलं आहे. तर १ एप्रिलपासून दूध ४९ रुपये प्रति लीटर होईल.

एक्सप्रेस-वेवर प्रवास करणे महागणार –
१ एप्रिलपासून आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर प्रवास करणे महागणार आहे. उत्तर प्रदेश एक्सप्रेस-वे औद्योगिक विकास प्राधिकरण बोर्डने २०२१-२२ या वर्षासाठी नव्या दरांना मंजुरी दिली आहे. कमीत-कमी ५ रुपये तर जास्तीतजास्त २५ रुपयांची वाढ केली जाईल.

विमान प्रवास (Air travel) –
१ एप्रिलपासून विमान प्रवासासाठी आता जास्त खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकारने डोमॅस्टिक फ्लाईट्सचं (Domestic flights) भाडे लोअर लिमिट ५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून आता एव्हिएशन सिक्योरिटी फीस अर्थात एएसएफ (Aviation Security Fees) वाढणार आहे. तसेच डोमॅस्टिक फ्लाईट्ससाठी एव्हिएशन सिक्योरिटी (Aviation security for domestic flights) फी २०० रुपये असेल. आता ही फी १६० रुपये आहे.

टीव्ही (TV) महागणार –
१ एप्रिलपासून दूरदर्शनच्या किंमतीत दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. यापूर्वीही मागील ८ महिन्यातच दर ३ ते ४ हजारांनी वाढल्या आहेत. त्यामुळे टीव्ही मॅन्युफॅक्चर्सने टीव्ही पीएलआय स्किम्समध्ये आणण्याची मागणी केली आहे.

एअर कंडिशनर, फ्रिज, कुलर महागणार –
यंदाच्या उन्हाळ्यात नवा AC किंवा फ्रिज खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. कारण १ एप्रिलपासून AC कंपन्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहेत. कंपन्या कच्च्या मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे AC च्या दरात वाढ करण्याची तयारी आहेत. AC कंपन्या किंमतीत ४ ते ६ टक्के वाढ करण्याची योजना होत आहेत. अर्थातच AC च्या एका यूनिटच्या किंमतीत १५०० ते २०० रुपयांची वाढ होऊ शकते.

कार (Car) –
चारचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्च महिन्यातच खरेदी करा. कारण एप्रिलच्या सुरुवातीपासून कार खरेदी करणं महागणार आहे. जापानी कंपनी Nissan ने आपल्या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. तसेच Datsun कारच्या किंमतीही वाढणार आहेत. रेनॉल्ट किगर (Renault Kiger) देशातील सगळ्यात स्वस्त कॉप्मॅक्ट SUV देखील महागणार आहे. कृषी उपकरणं तयारी करणाऱ्या एस्कॉर्ट्स लिमिटेडनेही १ एप्रिलपासून ट्रॅक्टरच्या किंमतीही वाढवण्याचा निर्णयघेण्यात आला आहे.