पुढच्या 9 दिवसात तुमच्या वाहनावर नक्की लावा ‘हे’ स्टीकर नाहीतर द्यावा लागेल दुप्पट ‘टोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टोल नाक्यावर गर्दी कमी करण्यासाठी आणि वाढत चाललेली प्रदूषणाची पातळी लक्षात घेऊन परिवहन मंत्रालयाने 1 डिसेंबर पासून नॅशनल हायवे वर चालणाऱ्या वाहनांना फास्टटॅग लावणे अनिवार्य केले आहे. केंदीय परिवह मंत्री नितीन गडकरी यांनी हायवे वरील सर्व टोल नाक्यांना याबाबत आधुनिक यंत्रणा वापरण्यास देखील सांगितले आहे.

सध्या एकूण 400 टोल नाक्यांवर फास्टटॅग द्वारे टोल वसूल केला जातो. परंतु लवकरच इतर सर्व टोल नाक्यांवर फास्टटॅग अनिवार्य केले जाणार आहे जेणेकरून वाहनांच्या लांब रांगा लागणार नाहीत. फास्टटॅगच्या वापराने वेळ तर वाचतोच शिवाय याला नेटबँकिंग तसेच अन्य अनेक मार्गांतून रिफील देखील करता येते. अनेक बँका यासाठी ग्राहकांना अनेक नवीन ऑफर देखील देत आहेत. तर काही बँक फास्टटॅगवर पैसे टाकल्यास एक लाखांपर्यंतचा विमा देखील वाहन चालकांना देत आहेत.

फास्टटॅग वापरणारा व्यक्ती टोल नाक्यावरून जाताच त्याला टोलचे पैसे कट झाल्याचा मेसेज आणि इमेल लगेच येतो. तसेच वापरकर्ते फास्टटॅग लॉगिन पोर्टलवर सुद्धा आपले स्टेटमेंट चेक करू शकतात.

कसे मिळणार ‘फास्टटॅग ‘
नवीन गाडी घेतानाच तुम्ही डिलरकडून फास्टटॅग घेऊ शकता. जुन्या वाहनधारकांना नॅशनल हायवेच्या पॉईंट ऑफ सेल वरून खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे फास्टटॅग खाजगी बँकांमध्ये सुद्धा विकत मिळते. यांचा टायप नॅशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया सोबत असतो. यामध्ये सिडीकेट बँक, ऍक्सिस बँक, एच डी एफसी बँक, एसबीआय बँक आणि आय सी आय सी आय बँकेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पेटीएम वरून सुद्धा फास्टटॅगची खरेदी करू शकता.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like