1 सप्टेंबरपासून बदलतील ‘या’ 7 गोष्टी, सर्वसामान्यांवर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – 1 सप्टेंबर 2020पासून सर्वसामान्यांच्या जीवनात अनेक बदल होणार आहेत. ज्यानंतर अनेक गोष्टी बदलणार आहे. ज्या गोष्टींमध्ये बदल होणार आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने एलपीजी, होम लोन, ईएमआय, एयरलाइन्ससह अने गोष्टींचा समावेश आहे. याचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. जाणून घेवूयात कोणकोणते बदल होणार आहेत…

1 एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. 1 सप्टेंबरला एलपीजीच्या दरात बदल होऊ शकतात. 1 सप्टेंबरला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती रिवाईज करू शकतात. अपेक्षा आहे की किमतीत घट होईल

2 महाग होईल विमान प्रवास
1 सप्टेंबरपासून विमान प्रवास महाग होऊ शकतो. नागरि उड्डाण मंत्रालय 1 सप्टेंबरपासून अंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रवाशांकडून उच्च विमानन सुरक्षा शुल्क म्हणून स्थानिक प्रवाशांकडून 150 ऐवजी 160 रूपये वसूल करणार आहे, तर अंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून 4.85 डॉलरऐवजी 5.2 डॉलर वसूल करणार आहे.

3 वाढणार ईएमआयचे ओझे, बंद होणार मोरेटोरियम
कोविड-19 संकट काळात लोन ग्राहकांना ईएमआयवर मार्चमध्ये सवलत होती, आता 31 ऑगस्टपासून ती बंद होणार आहे. यामुळे ईएमआयचा भार खिशावर पडणार आहे. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होऊ शकतो. बँकिंग क्षेत्रात हे पुढे सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता नाही. किरकोळ लोन (होम, आटो, पर्सनल) कशा प्रकारे जारी ठेवायचे याबाबत स्पष्टता नाही.

4 दिल्ली मेट्रो सुरू होऊ शकते
1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 सुरू होत आहे. अधिकार्‍यांनुसार, एक सप्टेंबरपासूनच दिल्ली मेट्रोच्या संचालनाला परवानगी दिली जाऊ शकते.

5 इंडिगो एयरलाइन्सचे उड्डाण सुरू होऊ शकते
बजेट एयरलाइन्स इंडिगो 1 सप्टेंबरपासून प्रयागराज, कोलकाता आणि सूरतसाठी उड्डाणे सुरू करणार आहे. भोपाळ-लखनऊ रूटवर कंपनी 180 सीटची एयर बस-320 चालवणार आहे. हे उड्डाण आठवड्यात तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारसाठी असेल. कंपनीने प्रयागराज, कोलकाता आणि सूरत उड्डाणाचे शेड्यूल जारी करून 1 सप्टेंबर आणि त्यानंतरच्या तारखेचे बुकिंग सुरू केले आहे.

6 शाळा उघडू शकतात
केंद्र सरकार अनलॉक-4 मध्ये अनेक प्रतिबंधांसह 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान शाळा उघडण्यासाठी गाईडलाइन्स तयार करत आहे. योजनेवर सचिव गट आणि हेल्थ मिनिस्टर हर्षवर्धन यांच्यात चर्चा झाली आहे. अंतिम अनलॉक गाईडलाइन्सच्या दरम्यान याबाबत माहिती दिली जाईल.

7 ओला, उबर ड्राइव्हर करू शकतात संप
ओला आणि उबर कंपनीच्या ड्रायव्हर्सने दिल्ली-एनसीआरमध्ये 1 सप्टेंबरपासून संप करण्याचा इशारा दिला आहे. भाडेवाढ, लोन रिपेमेंट मोरेटोरियमचा विस्तार इत्यादी त्यांच्या मागण्या आहे. दिल्लीच्या सर्वोदय ड्रायव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीत सिंह गिल यांनी म्हटले, जर सरकारने आमच्या समस्या सोडवल्या नाहीत, तर कॅब एग्रीगेटर्ससह काम करणारे सुमारे 2 लाख ड्राइवर संपावर जातील.

8 जीएसटी थकबाकीवर लागेल 18% व्याज
सरकारने म्हटले आहे की, वस्तु आणि सेवा कर (जीएसटी) बाकी भरण्यास उशीर झाल्यास 1 सप्टेंबरपासून एकुण टॅक्सच्या थकबाकीवर व्याज लागेल. या वर्षीच्या सुरूवातीला उद्योगांनी बाकी भरण्याच्या उशीरावर सुमारे 46,000 कोटी रूपयांचे थकीत व्याजाच्या वसूलीच्या निर्देशावर चिंता व्यक्त केली आहे. व्याज एकुण थकबाकीवर लावले होते. केंद्र आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या जीएसटी कौन्सिलने 39व्या बैठकीत निर्णय घेतला होता की, एक जुलै, 2017 पासून एकुण थकबाकीवर जीएसटी भरण्यास उशीर झाल्यास व्याज घेतले जाईल आणि कायदा तयार करण्यात येईल. मात्र, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (सीबीआयसी) 25 ऑगस्टला अधिसूचित केले की, 1 सप्टेंबर 2020पासून एकुण कराच्या थकबाकीवर व्याज घेतले जावे. याचा अर्थ, शिल्लक टॅक्स थकबाकीवर व्याज लावण्याची सवलत करदात्यांना एक जुलै 2017 च्या ऐवजी 1 सप्टेंबरपासून मिळेल.