1 एप्रिलला लॉन्च होणार ‘आरोग्य संजीवनी’ पॉलिसी, मिळणार ‘हे’ अनेक फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाजारात आरोग्य विमा (Health Insurance) चे खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट उपलब्ध आहेत. त्यामुळे विमा घेणारे विचारात पडतात की नेमकी कोणती आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी. त्यांना यांची तुलना कशी करावी हे माहित नसते. हा गोंधळ रोखण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना आरोग्य विमा खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) विमा कंपन्यांना परिपत्रक जारी केलेले मानक आरोग्य विमा उत्पादन (Standard Health Insurance Product, SHIP) प्रदान करीत आहे. ज्याद्वारे सर्व पॉलिसीधारकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

IRDAI च्या अनुसार, या पॉलिसीचे नाव ‘आरोग्य संजीवनी पॉलिसी’ (Arogya Sanjeevani Policy) असे असणार आहे. आरोग्य संजीवनी पॉलिसी नंतर कंपनी चे नाव जोडले जाणार आहे. तसेच विमा कमान्यांना पॉलिसी संदर्भात कोणत्याही कागदपत्रांमध्ये कोणतेही इतर नाव जोडण्याची परवानगी नसणार आहे. १ एप्रिल २०२० पासून कंपन्या नवीन पॉलिसी जारी करतील.

जाणून घेऊया स्टैंडर्ड हेल्थ इंश्योरेंस प्रॉडक्ट बद्दल काही खास गोष्टी

– आरोग्य संजीवनी पॉलिसी मध्ये कमीत कमी १ लाख रुपयांचे आणि जास्तीत जास्त ५ लाख रुपये सम अ‍ॅश्युअर्ड ची मर्यादा असणार आहे. हे एका वर्षाच्या पॉलिसी कालावधीसाठी ऑफर केले जाणार आहे.

– या आरोग्य विमा पॉलिसीकरीता किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ६५ वर्षे आवश्यक असणार आहे. त्याचे नूतनीकरण देखील केले जाऊ शकणार आहे. यामध्ये आपल्या पत्नीसाठी किंवा पतीसाठी, आपले पालक किंवा सासू-सासरे आणि ३ महिन्यांपासून २५ वर्षांपर्यंतच्या घरच्यांवर अवलंबून असणाऱ्या मुलांचा समावेश केला जाऊ शकतो.

– प्रीमियम पेमेंट कोणत्याही प्रकारे केले जाऊ शकते. आपण कोणत्याही प्रकारात म्हणजेच मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियमची भरपाई करू शकणार आहात. तसेच प्रीमियम किंमतीमध्ये एकसारखेपणा असणार आहे.

– वार्षिक प्रीमियम पेमेंटच्या बाबतीत ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध असणार आहे. तर अन्य देय प्रकरणांमध्ये १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी असेल.

– रूम रेंट ची कॅपिंग सम अ‍ॅश्युअर्डच्या २ टक्के किंवा ५००० रुपये असणार.

– स्वतंत्रपणे कौटुंबिक फ्लोटर योजना देखील असणार आहे. या पॉलिसीवर कोणताही राइडर किंवा टॉप अप नसणार आहे.

– मोतीबिंदू झाल्यास एका डोळ्यासाठी ४०,००० रुपयांचा खर्च किंवा सम अ‍ॅश्युअर्ड च्या २५ टक्के रक्कम असेल. आजारपण किंवा दुखापत झाल्यामुळे प्लास्टिक सर्जरी देखील कव्हर केली जाईल.

– जर अटी मंजूर नसतील तर विमाधारक १५ दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करू शकतो.

– प्रत्येक विमाधारकासाठी सर्व क्लेम्सवर ५ फीसी चे निश्चित को-वेतन लागू असेल.

– प्रत्येक क्लेम-फ्री पॉलिसी वर्षांमध्ये सम अ‍ॅश्युअर्ड ५ टक्के वाढविले जाईल पण रिन्युअल मध्ये कधीही ब्रेक लागलेला नसावा.

– या आरोग्य विमा पॉलिसीनुसार आयुष (AYUSH) उपचारासाठी रूग्णालयात दाखल करणे इत्यादींचा खर्चदेखील समाविष्ट आहे.

– भरतीच्या ३० दिवस आधी, डिस्चार्जपासून ६० दिवसांपर्यंत कव्हर प्रदान केले जाईल. यांमध्ये केमो थेरपी सारख्या उपचारांचा समावेश नसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/