खुशखबर ! बँकेत १ जुलै पासुन ‘हे’ ४ नियम लागू होणार, ग्राहकांचा फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेत अकाऊंट असलेल्यासाठी ही बाब जाणून घेणे आवश्यक आहे की १ जुलैपासून सर्वच बँकामध्ये काही बदल होणार आहेत. विशेष म्हणजे या तीन बदलांमुळे सामान्य लोकांचे जीवन सुसह्य होणार आहे. बँकांनी हे बदल ग्राहकांना चांगली सेवा मिळावी म्हणून करण्यात आले आहे. ऑनलाइन ट्रांजेक्शनवरील लागणारे शुल्क सरकारने आणि बँकांने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला, ज्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होईल.

SBI चे व्याजदर RBI च्या रेपो रेट नुसार

SBI ने १ जुलै पासून गृह कर्जाच्या व्याज दराला रेपो रेट बरोबर जोडले आहे. म्हणजेच SBI च्या गृहकर्जाच्या व्याजाचे दर पुर्णता रेपोरेटच्या दरावर आधारित असतील. त्यामुळे रेपो रेटमध्ये बदल झाले की SBI च्या गृहकर्जातील व्याज दर देखील कमी जास्त होतील.

आरबीआयने रेपो रेट मध्ये एकूण ०.७५ टक्के कपात केली आहे, त्यामुळे अशात SBI चे गृहकर्ज स्वस्त होईल. बऱ्याचदा रेपो रेटच्या दरात न की कमी केले जाते ना की वाढवले जातात. जर रेपो रेटमध्ये कोणतेही बदल झाले नाही तर SBI च्या गृहकर्जाचे व्याज दर स्थिर असतील.

ट्रांसफरवर लागणार शुल्क १ जुलै पासून बंद

आरबीआयने आरटीजीएस आणि एनईएफटी वरुन होणाऱ्या ट्रांसफरवर लागणारे शुल्क १ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. NEFT वरुन २ लाख रुपयांपर्यंत ट्रांसफर करु शकतात. डिजीटल ट्रांजैक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने हे शुल्क बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. NEFT वरुन पैसे ट्रांसफर केल्यास १ रुपयांपासून ५ रुपयांपर्यंत शुल्क लागू शकते. तर RTGS ने पैसे ट्रांसफर करायला ५ ते ५० रुपये शुल्क लागते.

या खातेधारकांना देखील मिळणार चेकबूकची सुविधा

बँकेत बेसिक खाते सुरु करणाऱ्यांना देखील चेक बुक आणि इतर सुविधा उपलब्ध होऊ शकतात. तसेच या सुविधांसाठी खातेधारकांना कमीत कमी रक्कम ठेवण्याची आवश्यक्ता नाही. हे आदेश १ जुलै पासून लागू होतील.

झीरो बँलेंस खातेधारकांसाठी या सुविधा

आरबीआयने बँकांना आपल्या झीरो बॅलेन्स अकाऊंट होल्डर्सला बचत खाते धारांकांना मिळाणाऱ्या सुविधा देण्यास अनिवार्य केलेले नाही. तर त्यांना अनुमती दिली आहे. म्हणजेच बँका नव्या नियमाअतंर्गत झीरो बॅलन्स असलेल्या खातेधारकांना चेक बुकची सुविधा देऊ शकतात, या खातेधारकांना झीरो बँक अकाऊंटला देखील जेवढ्या वेळा हवे तेवढ्या वेळा पैसे जमा करु शकतात आणि काढू देखील शकतात. यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 

Loading...
You might also like