Fact Check- 1 सप्टेंबरपासून देशभरात सगळ्यांचे माफ होणार वीजचे बिल ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीबद्दल कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की, सरकार वीज बिल माफी योजना 2020 आणत आहे. या अंतर्गत सप्टेंबरपासून प्रत्येकाचे वीज बिल माफ केले जाईल. याबाबत पीआयबीने हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.

वीज बिल माफीची बातमी खोटी आहे – पीआयबी फॅक्ट चेकचे म्हणणे आहे की, बनावट व्हिडिओमध्ये केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने लोकांना अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांपासून सावध रहाण्याचा इशारा दिला आहे. यूट्यूब व्हिडीओ क्लिपवर ‘फेक’ हा शब्द आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, वीज बिल माफी योजना 2020 अंतर्गत प्रत्येकाचे वीज बिल 1 सप्टेंबरपासून संपूर्ण देशात माफ केले जाईल.

पीआयबी फॅक्ट चेक-पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही पीआयबी फॅक्ट चेकवर व्हाट्सएप नंबर 918799711259 वर स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल पाठवू शकतो किंवा [email protected] वर मेल करू शकतो.