आता फक्‍त 40 मिनीटांमध्ये पोहचणार डोकलामला भारतीय सैन्य, मोदी सरकारनं बनवला रस्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधी डोकलाम येथे पोहचण्यासाठी भारतीय लष्कराला खूप परिश्रम घ्यावे लागत होते. या ठिकाणी जाण्यासाठी पर्वतांवर चढाई करावी लागत होती. ज्यासाठी सात तास इतका कालावधी लागत असे. मात्र आता भारतीय लष्कर डोकलाम येथे अगदी सहज पोहचू शकणार आहे.

लष्कराने बनवलेल्या भीम बेस ते डोकला रस्ता (Bheem Base-Dokala Road) या रस्त्यामुळे आता अवघ्या 40 मिनिटांमध्ये डोकलाम येथे जाता येणार आहे. या खोऱ्यांमध्ये भारत आणि चीनचे लष्कर एकमेकांसमोर आले होते. यानंतर 73 दिवसांसाठी दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. नंतर आपापसातील बोलणी नंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले होते. डोकलाम मध्ये चीनचे चुंबी खोरे आहे. या ठिकाणी भारत आणि भूटानची सीमा आहे.

या रस्त्यामुळे बदलणार भारत-चीनचे सैन्य समीकरण
या बनवलेल्या रस्त्यामुळे दोन्ही देशांच्या लष्कराचे समीकरण बदलणार आहे. डोकलाम वादाच्या वेळी या ठिकाणी जवानांना पोहचण्यासाठी सात तास लागले होते. त्यानंतर रस्ता निर्मितीच्या मागणीवर जोर देण्यात आला. हा रस्ता सिक्कीमजवळून डोकलामच्या खोऱ्यात प्रवेश करतो. सर्व हंगामात चालू शकेल इतका मजबूत हा रस्ता आहे.

बीआरओने भारत – चीन सीमेवर बनवले 61 रस्ते
लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या रस्त्यामुळे लष्कराचा प्रवास आणि सामानाची वाहतूक अगदी सुखकर होणार आहे. बीआरओने सांगितले आहे की शत्रूची कारवाई होण्याआधीच आपले लष्कर या रस्त्यामुळे जलद हालचाल करू शकणार आहे. बीआरओने आतापर्यंत भारत-चीन सीमेवर 3,346 किलोमीटर लांब अशा 61  रस्त्यांची निर्मिती पूर्ण केली आहे. यातील 2,400 किलोमीटरचे रस्ते प्रत्येक ऋतूमध्ये कार्यक्षम असणार आहेत. बीआरओ 2019 मध्ये 11 आणखी नवीन रस्त्यांची निर्मिती पूर्ण करणार आहे.

Visit : Policenama.com