गणेशोत्सवानिमित्त प्रशासनाकडून मोठा निर्णय ! ‘या’ तारखेनंतर सिंधुदुर्गात प्रवेशासाठी E-Pass बंधनकारक

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आता पावसाळा ऋतू आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे चित्र आहे. दरवर्षी राज्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. नोकरीसाठी मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी मूळगावी कोकणात जातात. पण, यंदा गणेश उत्सवावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणालाही प्रेवश मिळणार नाही. यासाठी ई पास असणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी गणेशोत्सवासंबंधी घेतलेल्या बैठकीचे वृत्त व्हायरल झाले आहे. यात 7 ऑगस्टच्या रात्री 12 नंतर बाहेरच्या जिल्ह्यातून कुणालाही सिंधुदुर्गात प्रवेश मिळणार नाही, असे म्हटले आहे. यंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्याहून नागरिक कोकणात जातात. पण, यंदा त्यांच्या जाण्यावर बंदी आहे. जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून तो नसल्याचा कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सतापाचे वातावरण आहे.

दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये होणे आवश्यक आहे. क्वारंटाईनसाठी नागरिकांनी घराची क्षमता आणि काय सोयी सुविधा आहेत ? याची खात्री करून घ्यावी. त्यांना 14 दिवसांसाठी घराबाहेर पडता येणार आहे. अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत.