खुशखबर ! उद्यापासून ‘या’ वस्तू होणार ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महागाईमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे याच स्थितीला सावरण्यासाठी सरकारने आता पावले उचलली आहेत. यामुळे आता सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार नाही.

१ ऑगस्ट २०१९ पासून म्हणजेत उद्यापासून लोकांना महागांई पासून दिलासा मिळणार आहे. कारण जीएसटी कौन्सिलने लोकांच्या हितार्थ करामध्ये कपात केली आहे आणि हे नवे दर उद्या पासून लागू होतील. याचा थेट परिणाम आता सामान्यावर होईल. यामुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत.

१. स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार
अर्थ संकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनाच्या करात कपात केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. १ ऑगस्ट २०१९ पासून हे दर लागू होतील.

जीएसटी कौन्सिलने आपल्या ३६ व्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांवर लावण्यात आलेला जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के केला आहे. उदाहणार्थ, १० लाख रुपयांच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर जीएसटीनंतर तुम्हाला ७० हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

२. एसबीआयच्या सेवेवर होणार परिणाम
सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआयच्या ग्राहकांना लाभ व्हावा म्हणून आयएमपीएस चार्जला रद्द केले आहे, आता हा बँकेचा निर्णय उद्या पासून लागू होईल. जे ग्राहक एसबीआयच्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग पेमेंटसारखे काम करु शकल तेही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय. याशिवाय एसबीआयने आरटीजीएस बरोबरच एनईएफटीवर लावलेल्या शुल्काला देखील बंद केले आहे.

३. स्वस्तात खरेदी करा घर
जे लोक नोएडा किंवा ग्रेटर नोएडामध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्या साठी आंनदाची बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा मध्ये प्रॉपर्टी सर्किल रेटमध्ये कपात झाली आहे. हा दर जवळपास ६ टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारने २५ टक्के सरचार्ज देखील रद्द केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय