‘सॅगसंग’ TV सह ‘या’ डिव्हाइसवर पाहता येणार नाही ‘Netflix’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सुप्रसिद्ध कंपनी आणि व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विस नेटफ्लिक्सचा डिसेंबरच्या सुरुवातीपासुन काही डिवाइसवर वापर करता येणार नाही. या डिवाइसच्या तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे नेटफ्लिक्स स्ट्रिमिंग शक्य होणार नाही. या डिवाइसमध्ये काही स्मार्ट टीव्ही आणि मिडिया प्लेअर सहभागी आहेत. असे सांगण्यात येते की 2010 आणि 2011 मध्ये तयार करण्यात आलेल्या स्मार्ट टीव्हीवर नेटफ्लिक्सचे अ‍ॅप काम करणार नाही. या बरोबर रोकू कंपनीच्या मिडिया प्लेअर सारखे रोकू 200 सी, रोकू 2050 एक्स, रोकू 2100 एक्स, रोकू एचडी, रोकू एसडी, रोकू एक्सडी आणि रोकू एक्सआरला नेटफ्लिक्स अ‍ॅप सपोर्ट करणार नाही.

सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीच्या मॉडेल्समधील इन बिल्ट नेटफ्लिक्स अ‍ॅप काम करणार नाही. परंतू अमेझॉन फायर टीव्ही स्टिक, अ‍ॅप्पल टीव्ही, सोनी प्ले स्टेशन सारखे एक्सटर्नल डिवाइसचा वापर करुन नेटफ्लिक्सची आनंद घेऊ शकतात.

जेव्हा तुम्ही टीव्ही सुरु कराल तर तुम्हाला एक मेसेज येईल की नेटफ्लिक्स या डिवाइसवर 1 डिसेंबरपासून उपलब्ध होणार नाही. यानंतर तुम्ही या डिवाइसवर नेटफ्लिक्स मूव्हीज्, शो पाहता येणार नाही.

नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपवर देखील नेटफ्लिक्स पाहता येईल. आयओएस बीटा व्हर्जनवर या प्रयोग सुरु आहे. जर त्यात यश आले तर नेटफ्लिक्सवर व्हिडओ पिक्चर गल पिक्टर मोडमध्ये पाहायला मिळेल. नेटफ्लिक्सवर अश्लील कटेंट देण्यात येतो असा देखील आरोप लावण्यात आला आहे. सेक्रेड गेम्सवर हे त्यातील एक उदाहरणं. याशिवाय अल्ट बालाजी आणि हॉटस्टारवर देखील असे कंटेंट उपलब्ध आहेत.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके