31 ऑक्टोबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचा नवा नियम 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यास आता नवी मर्यादा लावण्यात आली आहे. आता दिवसाला फक्त २० हजार रुपयेच एटीएम मधून काढता येणार आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’262ec1d8-c53f-11e8-8fdc-99412723aba0′]

याबाबत अधिक माहिती अशी की, सरकारचा डिजिटल इंडियाचा, डिजिटल व्यवहार करण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत, मात्र रोख रकमेच्या मागणी कमी झालेली नाहीये. म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने येत्या 31 ऑक्टोबरपासून आपल्या एटीएम मधून दिवसाला केवळ २० हजार रुपयेच काढता येणार आहेत. एटीएम ट्रांन्झॅक्शनमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या तक्रारी आणि डिजिटल-कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढवण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या शाखांना आदेशही  पाठवणायात आले आहेत.

[amazon_link asins=’B074G3TJYF,B01NAKR1Z9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3fbfdd1c-c53f-11e8-b8ea-eddb40b82eaf’]

सध्या  एसबीआय धारकांना एटीएम मधून दिवसाला 40 हजार रुपये काढता येत होते. मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवा नियम लागू केला आहे. यात केवळ २० हजार रुपयेच काढता येणार आहेत. याच बरोबर क्लासिक आणि मेस्ट्रो प्लॅटफॉर्मवरून जारी करण्यात आलेल्या डेबिड कार्डमधून रक्कम काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलींवर ‘तो’ ठराविक काळात करायचा अत्याचार

हा नवीन नियम दिवाळीपूर्वीच लागू होणार असल्याने या नियमाने सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींना सामना करावा लागणार आहे.

जाहिरात.